शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भारतात रामनामाशिवाय होऊ शकत नाही कोणतंही काम- योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 13:14 IST

उत्तर प्रदेशमधल्या महापालिका निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला आहे.

लखनऊ - उत्तर प्रदेशात सध्या महापालिका निवडणुकांची रंगत पाहायला मिळतेय. उत्तर प्रदेशमधल्या महापालिका निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला आहे. भारतात रामाशिवाय कोणतंही काम होऊ पूर्ण होऊ शकत नाही, असं योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.पालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपाकडून खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रचारात सक्रिय झाले आहेत. भगवान रामाचं नाव घेतल्याशिवाय कोणतंही काम पूर्ण होणार नाही. प्रभू राम हे आमची आस्था आणि श्रद्धेचं प्रतीक आहे. देशाच्या पूर्ण आस्थेचं केंद्रबिंदू भगवान राम असल्याचंही योगी आदित्यनाथांनी यावेळी आवर्जून सांगितलं आहे.उत्तर प्रदेश पालिका निवडणूक म्हणजे ही आमच्यासाठी एक प्रकारची परीक्षा आहे. आजपर्यंत केलेल्या कामाची पोचपावती म्हणून आम्ही पालिका निवडणुकीतील निकालाकडे पाहतो, असंही योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे 12 दिवसांत 33 सभा घेणार आहेत.आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे संस्थापक श्री श्री रविशंकरही 16 नोव्हेंबर रोजी अयोध्येचा दौरा करणार आहेत. ते राम जन्मभूमीच्या वादावर शांतीपूर्णरीत्या तोडगा काढण्यासाठी इतर पक्षकारांची भेट घेणार आहेत. परंतु श्री श्री रविशंकर हे मध्यस्थी करत असल्याच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली आहे. टीकाकारांची तोंडं मी बंद करू शकत नाही. राम मंदिराचा हा मुद्दा चर्चेनेच सुटू शकतो आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असंही श्री श्री रविशंकर म्हणाले आहेत. श्री श्री रविशंकर हे अयोध्या दौ-याच्या वेळी लखनऊमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेणार आहेत, अशी माहिती त्यांचे प्रतिनिधी भव्य तेज यांनी दिली आहे. श्री श्री रविशंकर 16 नोव्हेंबर रोजी अयोध्येत जाणार आहेत. राम मंदिर वादातील हिंदू आणि मुस्लिम पक्षकारांनाही श्री श्री रविशंकर यांच्या दौ-याची पूर्वकल्पना देण्यात आली आहे. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशRam Mandirराम मंदिर