शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

देशात परदेशी विद्यार्थ्यांच्या माहितीची अचूक नोंद ठेवणारी नाही यंत्रणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 20:32 IST

देशात नेमके किती परदेशी विद्यार्थी कोणत्या अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेत आहेत, याची अचूक माहिती उपलब्ध नाही..

ठळक मुद्दे केंद्र सरकारकडून ही माहिती संकलित करणारी यंत्रणा तयार करण्याचे काम सुरू देशामध्ये सध्या सुमारे ४७ हजार विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांमध्ये घेत आहेत शिक्षण

पुणे : पुण्यासह देशभरातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांच्या माहितीची अचुक नोंद ठेवणारी मध्यवर्ती यंत्रणाच सरकारकडे नाही. त्यामुळे देशात नेमके किती परदेशी विद्यार्थी कोणत्या अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेत आहेत, याची अचूक माहिती उपलब्ध नाही. केंद्र सरकारकडून ही माहिती संकलित करणारी यंत्रणा तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती भारतीय सांस्कृतिक स्वातंत्र्यासंबंधी परिषदेच्या उप महामहासंचालक नम्रता कुमार यांनी दिली.

पुण्यात दि. २८ व २९ जानेवारी रोजी आयोजित ‘डेस्टिनेशन इंडिया’ या राष्ट्रीय परिषदेच्या अनुषंगाने त्या पत्रकारांशी बोलत होत्या. देशामध्ये सध्या सुमारे ४७ हजार विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेत आहेत. पण हा आकडा अचुक नाही. सध्या परदेशी विद्यार्थी देशात आल्यानंतर गृह मंत्रालयाकडे त्याची नोंद होते. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्याने शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर ही माहिती विद्यापीठ अनुदान आयोगासह संबंधित नियामक संस्थेकडे संकलित जाते. पण अनेकदा काही विद्यार्थी अल्पमुदतीचे अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतात. त्याची नोंद होत नाही. त्यामुळे युजीसी, असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजसह अन्य नियामक संस्था आणि गृह मंत्रालयाकडील विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये खुप अंतर असते. हा आकडा नेमका किती हे सध्या सांगणे कठीण असल्याचे सुत्रांनी सांगितले.

याविषयी बोलताना नम्रता कुमार म्हणाल्या, ‘देशात नेमके परदेशी विद्यार्थी किती आहेत, याची माहिती ठेवणारी मध्यवर्ती यंत्रणा नाही. परदेशी विद्यार्थी पारंपरिक अभ्यासक्रमांसह व्यावसायिक व अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतात. वैद्यकीय अभ्यासक्रमांसह अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांची माहिती एकत्रित होत नाही. त्यामुळे कोणत्या अभ्यासक्रमात किती विद्यार्थी शिकतात हे समजत नाही. ही यंत्रणा विकसित करण्याचे काम सध्या सुरू आहे.

   परिषदेमध्ये या मुद्यावरही चर्चा होणार आहे.’ संख्या होतेय कमी दरम्यान, परदेशी विद्यार्थ्यांची संख्या काही प्रमाणात कमी होत असली तरी त्यामागे विविध कारणे आहेत. त्यादृष्टीने त्यांच्या अडचणी सोडविणे, आपल्या संस्कृतीशी त्यांना जोडणे, आकर्षण वाढविणे यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले.

परदेशी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा बदलत असून संशोधनासाठी येथील संस्थांना प्राधान्य मिळत आहे. त्यासाठी आवश्यक दर्जेदार सुविधा, शिक्षकही आपल्याकडे उपलब्ध असल्याचे सिम्बायोसिस विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर यांनी नमुद केले.-------------------------

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयCentral Governmentकेंद्र सरकार