शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

रनवे दिसेना, लँडिंग करू कुठे? पायलट्सना नव्हता धुक्याचा अनुभव; दिल्लीत १३४ विमाने लेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 05:58 IST

६० विमाने दुसऱ्या शहरांत उतरवली; उत्तर प्रदेशातील ३२ जिल्ह्यांत अलर्ट

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमध्ये धुक्याबाबत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दाट धुक्यामुळे रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्ग प्रभावित झाले आहेत. नवीन पायलट्सना धुक्याचा अनुभव नसल्याने रनवे कुठे आहे, हेच त्यांना कळत नव्हते. सावधगिरी म्हणून ६० विमाने दिल्ली ऐवजी दुसऱ्याच शहरात उतरवण्यात आली. तर दिल्ली विमानतळावर १३४ विमानांना उशीर झाला.  याशिवाय २२ रेल्वे ८ ते १० तास उशिराने धावत होत्या.

२८ डिसेंबर रोजी सकाळी साडेपाच वाजता सफदरजंगमध्ये ५० मीटर व पालममध्ये २५ मीटर दृश्यमानता नोंदवण्यात आली. पंजाब आणि हरयाणात सकाळी धुके कायम होते.

थंडीची लाट पसरल्याने काश्मीरच्या अनेक भागांमध्ये किमान तापमान उणे तीन अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे, तर पंजाब-हरयाणाला मात्र दिलासा मिळाला. श्रीनगरमध्ये बुधवारी रात्री किमान तापमान उणे ३.३ अंश, गुलमर्ग येथे उणे २.६, काझीगुंड येथे उणे ३.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. उत्तर प्रदेशात ३२ जिल्ह्यांमध्ये धुक्याचा रेड अलर्ट आहे.

या शहरांमध्ये दृश्यमानता काही ठिकाणी शून्य आणि काही ठिकाणी ५-१० मीटरपर्यंत पोहोचली आहे. ५ जिल्ह्यांतील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी मध्य प्रदेशातील ६ शहरांमध्ये गारपिटीची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांत उत्तर प्रदेश, राजस्थान आणि पंजाबमध्ये धुक्यामुळे झालेल्या रस्ते अपघातात १७ जणांना आपला जीव गमवावा लागला.

 

टॅग्स :airplaneविमानrailwayरेल्वे