शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

ना पाऊस, ना गारपीट, आता फक्त थंडीच!, पुढील आठवडाही राहणार गुलाबीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 07:56 IST

cold : महाराष्ट्राशेजारील गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश राज्यात पुढील आठवड्यात किमान तापमानात विशेष घट होऊन तेथेही चांगलीच थंडी जाणवेल. 

मुंबई/नवी दिल्ली :  देशाच्या काही भागांत सध्या जोरदार थंडी पडली आहे, तर तामिळनाडू व आसपासच्या भागांत पावसाचे थैमान सुरू आहे. मात्र संपूर्ण महाराष्ट्रात पुढील संपूर्ण आठवडा (६ जानेवारी २०२२ पर्यंत) ना पाऊस, ना गारपीट, तर केवळ फक्त थंडीच राहणार आहे. त्यामुळे शेतकरी व सवर्वसामान्य लोक आनंदात आहेत. भलत्या वेळी पावसाचा वा गारपीटीचा त्रास नसल्याचे समाधान आहे, असे अनेक शेतकरी मंडळींनीही बोलून दाखविले.

थंडीचा रबी पिके तसेच उन्हाळ (गावठी) पेर व लागवड केलेल्या कांद्याना फायदा होत आहे. तसेच चालू असलेल्या उन्हाळ कांदा लागवडीला नजीकच्या काळात वातावरणाचा कोणताही अडथळा जाणवणार नाही. मुंबईसह उपनगरी भागातही पुढील आठवड्यात किमान तापमान १३-१४ डिग्री पर्यंत तर कमाल तापमान २६-२७ डिग्रीपर्यंत घट येऊन चांगली थंडी जाणवू शकते.

महाराष्ट्राशेजारील गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश राज्यात पुढील आठवड्यात किमान तापमानात विशेष घट होऊन तेथेही चांगलीच थंडी जाणवेल. पुढील आठवड्यात संपूर्ण उत्तर भारतात  पाऊस, बर्फवृष्टी तर काही ठिकाणी गारपीट व दाट धुके व त्यातून सकाळच्या वेळेत खालावलेली दृश्यता अशा वातावरणीय घडामोडीची उलथापालथ होऊ शकते. या वातावरणीय घडामोडीमुळे महाराष्ट्रात चांगली थंडी पडू शकते, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

सध्या वायव्य तसेच उत्तर भारतातील अनेक भागांत थंडीचा कहर सुरू आहे. राजधानी दिल्लीच्या पालम भागात शुक्रवारी तापमान ४ अंशांच्या आसपास होते. सफदरजंग भागातही ते १० अंश होते. त्यामुळे दिल्लीकर कुडकुडताना दिसत  होते. हीच स्थिती उत्तर प्रदेश, हरयाणा, पंजाबमध्ये होती. काश्मीर, हिमाचल प्रदेंश आणि उत्तराखंडात तर सध्या बर्फवृष्टी  आहे. 

 त्या मानाते महाराष्ट्रातील थंडी बरीच सुसह्य आहे. ग्रामीण भागांत व शेतांमध्ये चांगलाच गारवा जाणवत असला तरी ही थंडी गुलाबी म्हणावी अशीच आहे. त्यामुळे ग्रामीण भागांत स्वेटर, शाली, गमछे दिसत असले तरी मुंबईसारख्या शहरांत मात्र फारच किरकोळ थंडी आहे. त्यामुळे स्वेटर व शाली अद्याप तरी बाहेर आलेल्या नाहीत. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रweatherहवामान