कोणतेही धोरण नेहमीसाठी प्रासंगिक नसते- राष्ट्रपती

By Admin | Updated: August 26, 2014 00:38 IST2014-08-26T00:38:45+5:302014-08-26T00:38:45+5:30

कोणतेही धोरण नेहमीकरता प्रासंगिक अथवा लागू असू शकत नाही. वृद्धीसाठी अर्थव्यवस्था लवचिक आणि गतिशील बनविण्यात धोरणांचे मोठे योगदान असले पाहिजे

No policy is always relevant - President | कोणतेही धोरण नेहमीसाठी प्रासंगिक नसते- राष्ट्रपती

कोणतेही धोरण नेहमीसाठी प्रासंगिक नसते- राष्ट्रपती

नवी दिल्ली : कोणतेही धोरण नेहमीकरता प्रासंगिक अथवा लागू असू शकत नाही. वृद्धीसाठी अर्थव्यवस्था लवचिक आणि गतिशील बनविण्यात धोरणांचे मोठे योगदान असले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केले आहे.
भारतीय व्यापार सेवेच्या ८ प्रशिक्षणार्थी आणि २० अधिकाऱ्यांच्या एका समूहाशी झालेल्या चर्चेदरम्यान ते बोलत होते. राष्ट्रपती भवनात जाऊन या अधिकाऱ्यांनी मुखर्जी यांची भेट घेतली. राष्ट्रपती म्हणाले, भारतीय अर्थव्यवस्था गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या बदलातून जात आहे. अशा काळात कोणतेही धोरण हे सर्व काळासाठी लागू असू शकत नाही. व्यवस्था ही गतिशील असते; त्यामध्ये काळानुरूप बदल घडणे आवश्यक आहे. वृद्धीसाठी आमच्या धोरणांमध्ये अर्थव्यवस्था लवचिक व गतिशील असण्याची गरज आहे. मुखर्जी यांनी गेल्या काही वर्षांपासून परकीय व्यापाराने भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडल्याचे अधोरेखित केले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: No policy is always relevant - President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.