शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

देवेगौडा पंतप्रधान असताना एकही हल्ला झाला नाही, मग आताच का?, कुमारस्वामी यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2019 4:53 AM

एच.डी. देवेगौडा पंतप्रधान असताना देशावर कधीही दहशतवादी हल्ले झाले नाहीत.

बंगळुरू : एच.डी. देवेगौडा पंतप्रधान असताना देशावर कधीही दहशतवादी हल्ले झाले नाहीत. मग ते आताच का होत आहेत, असा सवाल कर्नाटकचे मुख्यमंत्री व देवेगौडा यांचे पुत्र एच.डी. कुमारस्वामी यांनी विचारला आहे.म्हैैसूर येथे शुक्रवारी एका जाहीर सभेत ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काश्मीरला जाताना अत्यंत कडक सुरक्षाव्यवस्था लागते. मात्र, जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या सीमेलगतच्या भागात उघड्या जीपमधून व सुरक्षेचा बडेजाव न माजविता एकच पंतप्रधान फिरले ते म्हणजे देवेगौडा. ही वस्तुस्थिती जनतेने कधीच विसरू नये. भारत व पाकिस्तानमध्ये सध्या विलक्षण तणाव निर्माण झाला असून, त्यातून भविष्यात नेमकी काय स्थिती उद्भवेल हे आताच सांगणे कठीण आहे.कुमारस्वामी म्हणाले की, भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकिस्तानवर हल्ला केल्याबद्दल भाजपाने देशभर तिरंगा ध्वज फडकावत जल्लोष केला. त्या पक्षाच्या अशा वागण्यामुळे तणाव आणखी वाढणार आहे. जणूकाही स्वत:च विमाने चालवून पाकिस्तानवर बॉम्बफेक केली, अशा थाटात भाजपाचे नेते व कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव सुरू होता. आपल्या स्वार्थी हेतूंसाठी देशाशी निगडित संवेदनशील गोष्टींचा भाजपा गैरवापर करीत आहे. (वृत्तसंस्था)>व्हिडिओत फेरफारआपण शुक्रवारी केलेल्या भाषणाची व्हिडिओ फीत फेरफार करून टिष्ट्वटरवर झळकविण्यात आली, असा आरोप कुमारस्वामी यांनी भाजपावर केला आहे. या भाषणाची संपूर्ण व्हिडिओ फीत कुमारस्वामींनी टिष्ट्वटरवर उपलब्ध करून दिली आहे. लष्कर नव्हे तर स्वत:च युद्धभूमीत लढले असावे, असा भाजपा नेत्यांचा आवेश आहे, असे मी माझ्या भाषणात म्हटले होते. त्यातील काही शब्द वगळून या भाषणाची व्हिडिओ फीत भाजपाने झळकविल्याचा आरोप कुमारस्वामींनी केला.

 

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामीpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाterroristदहशतवादी