उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी बारामतीमध्ये एका भीषण विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या मृत्यूने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या अपघातामागे कटाची शक्यता वर्तवत सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामतीला जात होते. सकाळी ८:१० वाजता त्यांनी मुंबईहून उड्डाण केले 'बॉम्बार्डियर लियरजेट ४५' (VT-SSK) हे विमान सकाळी ८:५० च्या सुमारास बारामतीत एका शेतात कोसळले. या अपघातात हे ट्विन-इंजिन जेट पूर्णपणे नष्ट झाले आहे. 'व्हीएसआर व्हेंचर्स'द्वारे संचालित या विमानात अजित पवारांसह असलेल्या इतर लोकांचाही मृत्यू झाला आहे.
ममता बॅनर्जी यांनी या घटनेवर शोक व्यक्त करत राजकीय नेत्यांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केला आहे. "अजित पवार भाजप सोडण्याच्या आणि महायुतीपासून दूर जाण्याच्या विचारात होते, अशा चर्चा सोशल मीडियावर होत्या. त्यामुळे या अपघाताची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. आपला केवळ सुप्रीम कोर्टावरच विश्वास आहे. इतर तपास यंत्रणांवर नाही," असे ममतांनी म्हटले आहे.
तत्पूर्वी, ममता यांनी 'एक्स'वर, "अजित पवार यांच्या अकस्मात निधनाने धक्का बसला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या इतर लोकांचा आज सकाळी विमान अपघातात बारामती येथे मृत्यू झाला. यामुळे अत्यंत दुःखी आहे. त्यांचे काका शरद पवार यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना आणि दिवंगत अजित पवार यांच्या सर्व मित्रांना आणि समर्थकांसोबत माझ्या संवेदना," अशी पोस्ट केली होती.
याशिवाय, या घटनेनंतर काँग्रेस खासदार गौरव गोगोई, लालू प्रसाद यादव आणि प्रकाश आंबेडकर यांनीही स्वतंत्र आणि पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे.
Web Summary : Following Ajit Pawar's death in a plane crash, Mamata Banerjee called for a Supreme Court-monitored investigation. She cited social media discussions about Pawar's potential departure from BJP as a reason for the inquiry. Other leaders also demanded a transparent probe.
Web Summary : अजित पवार की विमान दुर्घटना में मौत के बाद, ममता बनर्जी ने सुप्रीम कोर्ट की निगरानी में जांच की मांग की। उन्होंने पवार के भाजपा से संभावित प्रस्थान के बारे में सोशल मीडिया पर चर्चाओं को जांच का कारण बताया। अन्य नेताओं ने भी पारदर्शी जांच की मांग की।