काश्मीरला भारतापासून कोणीही तोडू शकणार नाही- राजनाथ सिंह
By Admin | Updated: August 10, 2016 21:32 IST2016-08-10T21:32:35+5:302016-08-10T21:32:35+5:30
जगातील कोणतीही शक्ती जम्मू आणि काश्मीरला भारतापासून वेगळे करू शकत नाही

काश्मीरला भारतापासून कोणीही तोडू शकणार नाही- राजनाथ सिंह
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - जगातील कोणतीही शक्ती जम्मू आणि काश्मीरला भारतापासून वेगळे करू शकत नाही, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काश्मीरच्या मुद्द्यावर राज्यसभेत उत्तर दिले. काश्मीरबाबत चर्चा झाल्यास ती फक्त पाकव्याप्त काश्मीरसंदर्भात होईल, असे राजनाथ सिंह यांनी पाकला ठणकावून सांगितले आहे. काश्मीर खोऱ्यातील हिंसाचाराच्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेतील चर्चेदरम्यान त्यांनी सरकारच्या कामाचा आढावा देताना ही माहिती दिली आहे. १०० अॅम्बुलन्सचे नुकसान होऊन देखील सरकारने या ठिकाणी ४०० अॅम्बुलन्स तैनात केल्याचे यावेळी राजनाथ सिंह यांनी सांगितले आहे. तसेच हिंसाचारामध्ये ४५०० सुरक्षा जवान जखमी झाल्याची माहितीही त्यांनी राज्यसभेत दिली. काश्मीरमधील घटनेत पाकिस्तानचा हात असल्याचे सांगत, त्यांनी काश्मीरमध्ये पाकच्या समर्थनार्थ होणारी घोषणाबाजी सहन करणार नाही, असंही म्हटलं आहे. काश्मीर मुद्द्यावर शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सर्वपक्षीय बैठक होणार असल्याचीही माहिती यावेळी राजनाथ सिंह यांनी दिली आहे.