१ ऑगस्टपासून रात्रीची संचारबंदी नाही; जाणून घ्या काय बंद, काय सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 06:58 AM2020-07-30T06:58:24+5:302020-07-30T06:59:48+5:30

अनलॉक - ३ मध्ये जिम उघडणार; थिएटर, शाळा, कॉलेजवर बंदी कायम

No night curfew from August 1; Learn what starts in unlock 3 | १ ऑगस्टपासून रात्रीची संचारबंदी नाही; जाणून घ्या काय बंद, काय सुरु

१ ऑगस्टपासून रात्रीची संचारबंदी नाही; जाणून घ्या काय बंद, काय सुरु

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी अर्थव्यवस्था रुळावर यावी, यासाठी ५ ऑगस्टपासून काही निर्बंध मागे घेण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. या अनलॉक-३ साठी सरकाने नवीन नियमावली व मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.


त्यानुसार ५ ऑगस्टपासून जिम सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असून, रात्रीची संचारबंदीही उठविण्यात येणार आहे. मात्र, शाळा, महाविद्यालये, मेट्रो, रेल्वे आणि चित्रपटगृहे बंदच राहणार आहेत. देशात १ ऑगस्टपासून अनलॉक-३ लागू होईल. केवळ २५ टक्के क्षमतेवर चित्रपटगृहे सुरू करण्यास संमती दिली जाईल, अशी चर्चा होती. पण तूर्त चित्रपटगृहे बंद ठेवण्याचा निर्णय झाला. कोणत्याही राजकीय व धार्मिक कार्यक्रमांना राज्यांनी परवानगी देऊ नये, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
राज्ये व केंद्रशासित प्रदेशांशी आलेल्या सविस्तर चचेर्नुसार शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस ३१ आॅगस्टपर्यंत बंदच राहतील, असा निर्णयही घेण्यात आल्याचे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.


या नियमावली प्रमाणे वंदे भारत मिशनअंतर्गत मोजक्या संख्येने आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाचीही परवानगी देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांसदर्भात सरकार नंतर निर्णय घेणार आहे. मेट्रो रेल्वे, सिनेमा गृहे, स्विमिंग पूल, थिएटर्स, बार, सभागृहे पूर्वीप्रमाणेच बंद राहतील. तसेच, कंटेनमेन्ट झोनमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउन सुरूच राहील. सरकारचने ही सूट कंटेनमेंट झोनच्या बाहेरच्या भागात दिली आहे. कंटेनमेंट झोनसाठी घालण्यात आलेले निर्बंध तसेच कायमच असतील.


गृह मंत्रालयाने सांगितले, की ही नियमावली राज्ये व केंद्रशासित प्रदेशांकडून आलेल्या माहिती आणि शिफारशींचा आधारे तयार केली आहे. परिस्थितीनुसार निर्बंध कडक वा शिथिल करण्याची जबाबदारी संबंधुत राज्यांची असेल.
गृह मंत्रालयाने जारी केलेल्या या नियमावलीत ६५ वर्षांहून अधिक वय असलेल्यां नागरिकांना, आजारांशी संघर्ष करत असलेल्यां नागरिकांना, गर्भवती महिलांना आणि १० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांना घरातच राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. या शिवाय सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे सर्वांसाठी बंधनकारक आहे. विवाह समारंभांत ५० हून अधिक लोकांनी सहभागी होता येणार नाही, तर अंत्यविधीसाठीही जास्तीत जास्त २० जणच हजर राहू शकतील.
 

Web Title: No night curfew from August 1; Learn what starts in unlock 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.