शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

कोणीही विरोध केला तरी अलमट्टीच्या उंचीवर ठाम, कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 13:52 IST

केंद्राकडे अधिसूचनेसाठी दबाव टाकणार

शिरगुपी : कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटर करण्यासाठी केंद्राने अधिसूचना करावी, यासाठी जलसंपदा विभागाकडे दबाव टाकला आहे. कोणत्याही राज्याने कितीही विरोध केला तरी अलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटर करण्यावर कर्नाटक सरकार ठाम असल्याचे मत कर्नाटकचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री डी. के. शिवकुमार यांनी व्यक्त केले.कोल्हार (जि. बागलकोट) येथे विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, बेळगाव, विजापूर, बागलकोट व रायचूर जिल्ह्यातील जनतेला व शेतकऱ्यांना जमिनीबरोबरच मोठ उद्योगधंद्यासाठी पाणीपुरवठा व्हावा, यासाठी अलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटर करण्याचा संकल्प केला आहे.

यासाठी लवकरच केंद्रीय जलसंपदा मंत्री यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश राज्यांची कृष्णा लवादाच्या पाणी वाटपाबाबत चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी कर्नाटकाची बाजू ठामपणे मांडून कोणत्याही परिस्थितीत अलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटर करण्यासाठी केंद्र शासनावर दबाव टाकणार आहे.ते म्हणाले, अलमट्टी जलाशयाच्या व्याप्तीत येणाऱ्या व बेळगाव, विजापूर, बागलकोट, रायचूर जिल्ह्यांतील अनेक महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजना पूर्ण करून शेतकऱ्यांच्या दोन्ही हंगामांतील पिकाला पाणी देण्यासाठी प्रयत्नशील आहे. कृष्णा भाग जलनिगमच्या सर्व योजना पूर्ण करण्यासाठी कर्नाटक शासनाकडून सर्वच अंदाजपत्रकात कोट्यवधी रुपयांचे अनुदान ठेवण्यात आले आहे.

भाजप सरकार योजना पूर्ण करण्यासाठी अपयश ठरल्यामुळे सत्ताधाऱ्यांवर खोटे-नाटे आरोप करून जनतेची दिशाभूल करत आहे. त्यांनी एकाच व्यासपीठावर येऊन आरोप सिद्ध करून दाखवावे.

कर्नाटकात पुन्हा काँग्रेसच येईलसध्याच्या आमच्या सरकारने दोन वर्षे पूर्ण करून सामान्य जनतेचा विश्वास संपादन केला आहे. त्यांना अनेक महत्त्वाकांक्षी योजना देण्याबरोबरच त्यांच्या समस्या पूर्ण करण्यासाठी आपले सरकार कायम प्रयत्नशील आहे. तीन वर्षांनंतर पुन्हा होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष सत्तेवर येणार असल्याचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीKarnatakकर्नाटकDamधरणMaharashtraमहाराष्ट्र