No matter how big the battle will be, it will not be back: Sonia Gandhi | लढाई कितीही मोठी असो, मागे हटणार नाही : सोनिया गांधी
लढाई कितीही मोठी असो, मागे हटणार नाही : सोनिया गांधी

नवी दिल्ली - संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा आणि रायबरेलीच्या नवनिर्वाचित खासदार सोनिया गांधी यांनी शुक्रवारी आपल्या मतदार संघातील काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि स्वाभिमान दलाच्या कार्यकर्त्यांचे लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून दिल्याबद्दल आभार मानले. सोनिया गांधी यांनी पत्र लिहून रायबरेलीच्या जनतेचे आभार मानले.

सोनिया म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीत नेहमीप्रमाणे यावेळी माझ्यावर तुम्ही सर्वांना विश्वास दाखवला. काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याप्रमाणेच सपा, बसपा, स्वाभिमान दलाच्या सहकाऱ्यांनी माझ्या विजयासाठी प्रयत्न केले. त्यासाठी मी सर्वांची आभारी आहे. माझे जीवन तुमच्या सर्वांसमोर खुल्या पुस्तकाप्रमाणे आहे. तुम्ही सर्व माझ्या कुटुंबियाप्रमाणे आहात. तुमच्याकडून मला प्रेरणा मिळते. हीच माझी संपत्ती असल्याचे सोनिया म्हणाल्या.

आपण देखील कुटुंबियांची काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र येणारे दिवस खडतर आहेत. तरी देखील तुमचा पाठिंबा आणि विश्वासाच्या जोरावर काँग्रेस पक्ष प्रत्येक आव्हानाला पार करेल. लढाई कितीही मोठी असो, मी तुम्हा सर्वांना वचन देते की, देशाच्या प्रतिमेसाठी आपण सर्वस्व पणाला लावण्यासाठी तयार असल्याचे सोनिया गांधी यांनी म्हटले.


Web Title: No matter how big the battle will be, it will not be back: Sonia Gandhi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.