काशी येथे सुरू असलेल्या विकासकामांदरम्यान मणिकर्णिका घाट येथील काही प्राचीन मंदिरे तोडण्यात आल्याच्या घटनेबाबत सध्या तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आता समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही या मुद्द्यावरून भाजपावर टीका केली आहे. एका कार्यक्रमामध्ये उपस्थितांना संबोधित करताना अखिलेश यादव म्हणाले की, भाजपाने जेवढी पौराणिक मंदिरे तोडली आहेत तेवढी कुठल्या राजानेही तोडली नसतील. भाजपाला वारसा आणि त्याच्या संरक्षणाबाबत काही समजत नाही. तसेच ते इतिहास मिटवून स्वत:चा इतिहास घडवू इच्छित आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
अखिलेश यादव काशीमधील तोडलेल्या मंदिराबाबत म्हणाले की, काशीमधील ते मंदिर प्राचीन आणि खूप सुंदर होते. मात्र भाजपाने संपूर्ण काशीची अवस्था खूप वाईट करून ठेवली आहे. काशी ना क्योटो बनली ना काशी आपली जुनी ओळख वाचवू शकली. भाजपाला कुणाचीच चांगली कामं आवडत नाहीत, हे लोक सारं काही तोडून टाकू इच्छितात, असा आरोपही अखिलेश यादव यांनी केला.
अखिलेश यादव पुढे म्हणाले, जेवढी पौराणिक मंदिरं भाजपाने तोडली आहेत. तेवढी मंदिरे कदाचित पृथ्वीवरील कुठल्याही राजाने तोडली नसतील. ही मंदिरं तोडून ठेके दिले जातात. नंतर बांधकामाचा खर्च वाढवून त्यामधून नफा कमावला जातो. या नफावसुलीसाठीच मंदिरे तोडली जात आहेत, असा दावाही अखिलेश यादव यांनी केला. अखिलेश यादव यांच्या या वक्तव्याची आता राजकीय वर्तुळातही मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे.
Web Summary : Akhilesh Yadav accuses BJP of demolishing more ancient temples than any king during Kashi development. He criticized BJP for destroying heritage and manipulating history for profit through temple demolition and construction contracts in Kashi, which has worsened under their rule.
Web Summary : अखिलेश यादव ने भाजपा पर काशी विकास के दौरान राजाओं से ज़्यादा प्राचीन मंदिर तोड़ने का आरोप लगाया। उन्होंने कहा कि भाजपा विरासत नष्ट कर रही है और मंदिर विध्वंस व निर्माण ठेकों से लाभ के लिए इतिहास बदल रही है। काशी की हालत बदतर हुई है।