CoronaVirus News: ...तसा कुठलाच पुरावा नाही! WHOच्या स्पष्टीकरणानं सगळ्यांची चिंता वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 12:05 PM2021-04-13T12:05:14+5:302021-04-13T12:05:48+5:30

CoronaVirus News: देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना, रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण झाला असताना WHOचं चिंता वाढवणारं स्पष्टीकरण

no evidence of remdesivir effectiveness against covid says who chief scientist | CoronaVirus News: ...तसा कुठलाच पुरावा नाही! WHOच्या स्पष्टीकरणानं सगळ्यांची चिंता वाढवली

CoronaVirus News: ...तसा कुठलाच पुरावा नाही! WHOच्या स्पष्टीकरणानं सगळ्यांची चिंता वाढवली

googlenewsNext

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्यानं वाढत आहे. गेल्या महिनाभरापासून कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 1,61,736 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 879 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,36,89,453 वर पोहोचली आहे.  कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडेसिविरचा वापर केला जात आहे. त्यामुळे रेमडेसिविरचा तुटवडा जाणवू लागला आहे. अशातच जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) स्पष्टीकरणामुळे चिंतेत भर पडली आहे.

स्पुटनिक व्ही लसीला DCGIची मंजुरी; जाणून घ्या किंमत अन् कितपत प्रभावी

कोरोना रुग्णांच्या उपचारात रेमडेसिविर प्रभावी ठरत असल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचं डब्ल्यूएचओनं म्हटलं आहे. देशात रेमडेसिविरची मागणी वाढत असताना, त्यासाठी काळाबाजार होत असताना डब्ल्यूएचओकडून आलेलं स्पष्टीकरण महत्त्वपूर्ण मानलं जात आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारात होत असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या वापरावर डब्ल्यूएचओनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. कोरोनाच्या उपचारांत रेमडेसिविर उपयोगी ठरत असल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचं डब्ल्यूएचओनं सांगितलं आहे.

बापरे! अवघ्या 11 दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण; देण्यात आलं Remdesivir इंजेक्शन, प्रकृती चिंताजनक

डब्ल्यूएचओच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन आणि कोविड तांत्रिक टीमच्या प्रमुख डॉय मारिया वेन केरखोव यांनी रेमडेसिविर इंजेक्शनच्या वापरावर प्रश्न उपस्थित केले. 'रेमडेसिविर इंजेक्शनच्या पाच चाचण्या झाल्या आहेत. मात्र त्यातून ना कोरोना रुग्ण बरे झाल्याचं निष्पन्न झालंय ना मृतांचा आकडा कमी झाल्यानं दिसून आलंय. सध्या आम्ही एका मोठ्या चाचणीची वाट पाहात आहोत. त्या चाचणीच्या अहवालातून रेमडेसिविरच्या परिणामकारकतेवर स्पष्टपणे भाष्य करता येईल,' असं स्वामीनाथन आणि केरखोव यांनी सांगितलं.

Web Title: no evidence of remdesivir effectiveness against covid says who chief scientist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.