शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशात 3000 टन सोनं सापडलं नाही, जीएसआयनं दावा फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 21:56 IST

जीएसआयचे महासंचालक एम.श्रीधर यांनी कोलकाता येथून याबाबत माहिती दिली.

ठळक मुद्देसोनभद्र जिल्ह्यात सुमारे तीन हजार टन सोने मिळण्याची कोणतीच माहिती नसल्याचे जीएसआयने म्हटले आहे. जीएसआयचे महासंचालक एम.श्रीधर यांनी कोलकाता येथून याबाबत माहिती दिली.सोनभद्र जिल्हात सोन्याचे साठे आढळून आले आहेत, असे दोन दिवसांपूर्वी सोनभद्र जिल्ह्याचे खाण अधिकारी के.के. राय यांनी सांगितले होते.

कोलकाता: उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात सोन्याच्या खाणी सापडल्याची बातमी काल सर्वत्र पसरली होती. मात्र, भारतीय भूगर्भशास्त्र सर्वेक्षण विभागाने (जीएसआय) याबाबतची माहिती फेटाळून लावली आहे. सोनभद्र जिल्ह्यात सुमारे तीन हजार टन सोने मिळण्याची कोणतीच माहिती नसल्याचे जीएसआयने म्हटले आहे. 

जीएसआयचे महासंचालक एम.श्रीधर यांनी कोलकाता येथून याबाबत माहिती दिली. यासंबंधीची माहिती किंवा डेटा जीएसआयकडून कोणालाही दिला जात नाही. जीएसआयने सोनभद्र जिल्ह्यात सोने असल्याचा कोणताही अंदाज वर्तविला नव्हता, असे एम.श्रीधर यांनी सांगितले.  ते म्हणाले, "राज्य युनिटसोबत सर्व्हे केल्यानंतर आम्ही कोणत्याही सापडलेल्या धातूची माहिती देतो. आम्ही (जीएसआय, उत्तर विभाग) या भागात 1998-99 आणि 1999- 2000 मध्ये उत्खनन केले होते. त्यासंबंधीचा अहवाल उत्तर प्रदेशच्या डीजीएमकडे सोपविला होता, जेणेकरून ते पुढील कारवाई करू शकतील."

याचबरोबर, सोन्यासाठी उत्खनन करणे समाधानकारक नव्हते. सोनभद्र जिल्ह्यातील सोन्याच्या मोठ्या स्त्रोताचे परिणाम सुद्धा जास्त चांगले नव्हते, असेही एम.श्रीधर  यांनी सांगितले. तसेच, जिल्ह्यात सोने शोधण्याचा प्रयत्न केल्यानंतर आम्ही आमच्या अहवालात असे काहीच म्हटले नाही. अहवालात जीएसआयने 52,806.25 टन धातूंचा अंदाज वर्तविला आहे. तर सोन पहाडीच्या सब ब्लॉक-एचमध्ये प्रति टन धातूचे प्रमाण 3.03 ग्रॅम सोने मिळण्याचा अंदाज वर्तविला आहे, असे एम. श्रीधर म्हणाले. 

दरम्यान, सोनभद्र जिल्हात सोन्याचे साठे आढळून आले आहेत, असे दोन दिवसांपूर्वी सोनभद्र जिल्ह्याचे खाण अधिकारी के.के. राय यांनी सांगितले होते. 'जीएसआय'च्या अंदाजानुसार सोनपहाडीमध्ये 2700 लाख टन सोने सापडले आहे. तर, हरदीमध्ये 650 लाख टन सोने सापडले आहे, असे के.के. राय यांनी सांगितले होते. मात्र, हा दावा एम. श्रीधर यांनी फेटाळून लावला आहे. 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशGoldसोनं