शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

जम्मू काश्मीरमध्ये बिघडला 'इंडिया' आघाडीचा खेळ; सत्तास्थापनेत काँग्रेस बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 16:04 IST

नव्या सरकारबाबत काँग्रेसची जी भूमिका समोर आली आहे त्यातून या दोन्ही पक्षात चांगले संबंध नाहीत असं चित्र दिसून येत आहे.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये ओमर अब्दुल्ला यांच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्र्यांसह १० कॅबिनेट मंत्री शपथ घेतील. या सोहळ्याला इंडिया आघाडीतील बहुतांश नेते सहभागी होतील परंतु सोहळ्याआधीच याठिकाणी रंगाचा बेरंग झाला आहे. जम्मू काश्मीरच्या नव्या सरकारमध्ये काँग्रेस सहभागी होणार नाही, आज कुणीही शपथ घेणार नसून सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा आम्ही विचार करतोय असं काँग्रेसनं स्पष्ट केले आहे.

जम्मू काश्मीरचे काँग्रेस प्रभारी भरत सिंह सोलंकी यांनी म्हटलं की, सध्या नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे. चर्चा पूर्ण झाल्यानंतरच पुढचा निर्णय घेतला जाऊ शकतो. चर्चा सुरू असताना आज कुणीही काँग्रेस आमदार शपथ घेणार नाही असं सांगितले. जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस सत्तेत सहभागी होणार की बाहेरून सरकारला पाठिंबा देणार याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. जम्मू काश्मीरची निवडणूक काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सनं एकत्रित लढवली होती. त्यामुळे नव्या सरकारमध्ये काँग्रेस सहभागी असेल असं मानलं जात होते. 

परंतु आज शपथविधी सोहळ्याआधी काँग्रेसनं त्यांची भूमिका स्पष्ट करत सर्वांनाच हैराण केले आहे. काँग्रेस आमदार मंत्रि‍पदाची शपथ घेणार नाहीत याचा अर्थ कॅबिनेट वाटपाबाबत अंतिम तोडगा होऊ शकला नाही किंवा काँग्रेस सरकारला बाहेरुन पाठिंबा देत कुठल्याही प्रकारे दबावात राहू इच्छित नाही. ओमर अब्दुल्ला यांच्या शपथविधीला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी श्रीनगरला पोहचल्या होत्या. मात्र नव्या सरकारबाबत काँग्रेसची जी भूमिका समोर आली आहे त्यातून या दोन्ही पक्षात चांगले संबंध नाहीत असं चित्र दिसून येत आहे.

दरम्यान, नवीन मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारशी जुळवून घेण्याचे संकेत दिलेत. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी संघर्ष टाळण्याचा प्रयत्न ओमर अब्दुल्ला यांच्याकडून करण्यात येत आहे. मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल यांची भूमिका प्रशंसनीय आहे आणि दोन्ही पक्षांनी आपल्या शब्दावर ठाम राहिल्यास जम्मू-काश्मीरच्या जनतेसाठी खूप चांगली गोष्ट असेल. ओमर अब्दुल्ला यांनी आधीच सांगितले आहे की, केंद्राशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनही त्यांची अपेक्षा आहे. नायब राज्यपाल आणि केंद्र सरकारमधील संघर्षापेक्षा जम्मू-काश्मीरच्या जनतेने नॅशनल कॉन्फरन्सकडे सोपवलेली जबाबदारी अधिक महत्त्वाची आहे आणि मनोज सिन्हा देखील असेच बोलत आहेत. 

टॅग्स :Omar Abdullahउमर अब्दुल्लाcongressकाँग्रेसBJPभाजपाJammu Kashmirजम्मू-काश्मीर