शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

No Confidence Motion: सोनिया गांधी यांचे गणित कच्चे- अनंत कुमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 17:09 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडे अविश्वास दर्शक ठरावावर मात करण्याइतके संख्याबळ असूनही सोनिया गांधी यांनी काल केलेल्या या विधानामुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले होते.

नवी दिल्ली- कोण म्हणतंय आमच्याकडे संख्याबळ नाही? अशा शब्दांमध्ये अविश्वास ठरावाच्या भविष्याबद्दल मत मांडणाऱ्या काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना भाजपाने आज प्रत्युत्तर दिले आहे. सोनिया गांधी यांचे गणित कच्चे आहे अशा शब्दांमध्ये अनंत कुमार यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडे अविश्वास दर्शक ठरावावर मात करण्याइतके संख्याबळ असूनही सोनिया गांधी यांनी काल केलेल्या या विधानामुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले होते. त्याबाबत बोलताना अनंत कुमार यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले,'' सोनियाजींचे गणित कच्चे आहे. त्यांनी याचप्रकारे 1996 साली आकडेमोड केली होती. पुढे काय झालं हे आम्हाला माहिती आहे. त्याची आकडेमोड पुन्हा एकदा चुकीची ठरेल. मोदी सरकारकडे संसदेत आणि संसदेबाहेरही बहुमत आहे. आम्हाला सर्व दिशांनी पाठिंबा मिळेल हे तुम्हाला दिसेलच.''1999 साली सोनिया गांधी यांनी आमच्याकडे 272 सदस्य असून अजून आमच्याकडे लोक येत आहेत अशाप्रकारचे विधान केले होते. मात्र अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारचा एका मताने पराभव केल्यानंतर प्रत्यक्षात त्यांचा पक्ष सत्ता स्थापन करु शकला नाही.

1999 साली काय झाले होते- 1999 साली पंतप्रधान वाजपेयी यांनी सर्वात प्रथम अविश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागले. यावेळेस त्यांचे सरकार केवळ एका मताने पराभूत झाले. बहुजन समाज पक्षाने भारतीय जनता पार्टीस मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांनी आयत्यावेळेस भाजपा सरकाविरोधात भूमिका घेतली.  हे सरकार दलितविरोधी आहे असे सांगत या पक्षाने सरकारला विरोध केला होता.अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार कोसळण्याचे खरे कारण जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार सैफुद्दिन सोझ यांनी अचानक अविश्वास ठरावाला पाठिंबा देऊन रालोआ सरकारविरोधात मतदान केले. यामुळे त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले सोझ सध्या काँग्रेसमध्ये आहेत.  त्याहून धक्कादायक घटना लोकसभेत त्यावेळेस घडली होती ती म्हणजे गिरिधर गमांग यांनी लोकसभेत येऊन सरकारविरोधात मतदान करणे. गमांग ओडिशाचे मुख्यमंत्री होते, त्यांनी ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला होता, मात्र त्यांनी लोकसभेचे सदस्यत्व सोडले नव्हते. त्यांच्या एका मताचाही रालोआ सरकारला फटका बसला. आज हेच गमांग भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत.

टॅग्स :No Confidence motionअविश्वास ठरावSonia Gandhiसोनिया गांधीParliamentसंसद