No Confidence Motion: रामदास आठवलेंनी ऐकवली खास कविता; काँग्रेसला टोला, मोदींना पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 21:21 IST2018-07-20T21:19:58+5:302018-07-20T21:21:24+5:30
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी खास आपल्या शैलीत कविता ऐकवून चाहत्यांची मनं जिंकली.

No Confidence Motion: रामदास आठवलेंनी ऐकवली खास कविता; काँग्रेसला टोला, मोदींना पाठिंबा
नवी दिल्लीः लोकसभेतील अविश्वास प्रस्तावावर बोलताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी खास आपल्या शैलीत कविता ऐकवून चाहत्यांची मनं जिंकली. 'आजच्या टी-२० सामन्यात राहुल गांधींनी चांगल्या धावा काढल्यात. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमचे कर्णधार आहेत, विराट कोहली आहेत. ते दुप्पट धावा करतील आणि हा सामना जिंकण्यासाठी आम्ही त्यांना मदत करू', असं वर्णन आठवलेंनी केलं, तेव्हा सभागृहात एकच हशा पिकला.
रामदास आठवले यांची कविता अशी...
आज राहुल गांधीजी ने प्रधानमंत्रीजी के गले को मिलाया गला
लेकीन नरेंद्र मोदी जी के पास है काँग्रेस को हराने की कला
काँग्रेस ने पुरे किए थे सत्ता में ५०-५१-५५ साल
तब उन्होने कमाया है बहुतही माल
२०१४ में नरेंद्र मोदीजी ने किया था बहुत बडा कमाल
इस लिए देश मे हो रहा है विकास का धमाल
काँग्रेस का देश मे आज ठीक नही है हाल
इसलिए नरेंद्र मोदी जितेंगे २०१९ का साल