- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : संरक्षणमंत्र्यांवर खोटे आरोप करून, संसदेची दिशाभूल केल्याचा आरोप भाजपाने राहुल गांधी यांच्यावर केला आहे. राफेल व्यवहाराबाबत केलेल्या आरोपांमुळे भाजपा राहुल गांधी यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव आणणार आहे. संसदीय कार्यमंत्री अनंतकुमार यांनी सांगितले की, राहुल गांधी यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव दाखल केला जाईल. अनंतकुमार म्हणाले की, काँग्रेसचे अध्यक्ष एवढी चुकीची माहिती ठेवतात, हे दुर्दैव आहे. ते अद्याप अपरिपक्व आहेत.>गुप्ततेचा करार २००८ सालीच : फ्रान्सराफेल कराराबाबत राहुल गांधी यांनी केलल्या वक्तव्यावर फ्रान्सने निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, भारत व फ्रान्स यांनी गोपनीय माहिती उघड न करण्याची हमी त्या सुरक्षाविषयक करारात आहे. या कराराचा भंग झाल्यास त्याचा थेट विपरित परिणाम दोन्ही देशांची सुरक्षा व संरक्षण क्षमतेवर होऊ शकतो.
No Confidence Motion : राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग आणण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 06:33 IST