'लष्कर-ए-तोयबाचा एकही कमांडर जिवंत राहणार नाही'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 16:33 IST2017-11-26T16:25:11+5:302017-11-27T16:33:18+5:30
मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदची गेल्याच आठवड्यात नजरकैदेतून सुटका झाली. यावरुन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पाकिस्तानला चांगलेच फटकारलं आहे.

'लष्कर-ए-तोयबाचा एकही कमांडर जिवंत राहणार नाही'
सूरत - मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदची गेल्याच आठवड्यात नजरकैदेतून सुटका झाली. यावरुन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पाकिस्तानला चांगलेच फटकारलं आहे. लष्कर-ए-तोयबाचा कोणताही कमांडर फार काळ जिवंत राहणार नाही, अशा शब्दांमध्ये जेटलींनी हाफिज सईदच्या सुटकेच्या निर्णयावर भाष्य केले. हाफिजच्या सुटकेनंतर जगभरातून पाकिस्तानचा निषेध झाला, असेही त्यांनी म्हटले.
भारतीय लष्कराच्या कारवाईचा संदर्भ देताना जेटलींनी म्हणाले की. मागील आठ महिन्यांमधील स्थिती पाहता, लष्कर-ए-तोयबाचा कोणताही कमांडर जास्त दिवस जिवंत राहत नाही, हे स्पष्ट झाले आहे.
मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला नऊ वर्षे पूर्ण व्हायला दोन दिवस असताना त्यांनी (पाकिस्तानने) हाफिज सईदची सुटका केली. त्यांच्या या निर्णयावर जगभरातून टीका होत आहे. दहशतवादाचे समर्थन करणाऱ्या देशाला आंतरराष्ट्रीय समुदायात कोणतेही स्थान नाही, अशा शब्दांमध्ये संपूर्ण जगाने पाकिस्तानचा निषेध केला आहे, असे जेटलींनी म्हटले. ते गुजरातमधील सूरत येथील एका सभेला संबोधित करत होते.
लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदची गेल्याच आठवड्यात नजरकैदेतून सुटका झाली. हाफिज सईदच्या नजरकैदेत वाढ करावी, अशी याचिका पाकिस्तान सरकारकडून करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने पाकिस्तान सरकारची याचिका फेटाळून लावल्याने सईदची सुटका झाली.