एलएसीतील कोणताही बदल मान्य नाही - बिपीन रावत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2020 01:43 IST2020-11-07T01:41:02+5:302020-11-07T01:43:32+5:30
Bipin Rawat : एका डिजिटल संमेलनात बोलताना रावत म्हणाले की, चीनचे सैन्य लडाखमधील आपल्या दुस्साहसाबाबत परिणाम भोगत आहे.

एलएसीतील कोणताही बदल मान्य नाही - बिपीन रावत
नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये एलएसीजवळ परिस्थिती तणावपूर्ण आहे. आमची भूमिका स्पष्ट असून वास्तविक नियंत्रण रेषेमध्ये कोणताही बदल स्वीकारला जाणार नाही, असे स्पष्ट मत चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी व्यक्त
केले.
एका डिजिटल संमेलनात बोलताना रावत म्हणाले की, चीनचे सैन्य लडाखमधील आपल्या दुस्साहसाबाबत परिणाम भोगत आहे. सीमेवरील संघर्ष, वाद पाहता सैन्य कारवाईचे रूपांतर मोठ्या संघर्षात बदलण्याची शक्यताही नाकारता येत नाही. सुरक्षेबाबतच्या आव्हानांवर बोलताना ते म्हणाले की, पाकिस्तान आणि चीनसोबतच्या सततच्या संघर्षामुळे या भागात अस्थिरता निर्माण होण्याची आणि वाढण्याची शक्यता आहे. सर्जिकल स्ट्राइकने कठोर संदेश दिला आहे की, पाकिस्तान जर अतिरेक्यांना सीमेपलीकडे पाठवत असेल तर त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील.