शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

कोरोना व्हायरस : "जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं"; पंतप्रधान मोदींनी दिला सावधगिरीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2020 17:44 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेंतर्गत मध्य प्रदेशात 12,000 गावांमधील 1.75 लाख घरांचे लोकार्पण करून 1.75 लाख कुटुंबांचा गृह प्रवेश करवला. यावेळी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने लाभार्थ्यांशीही संवाद साधला.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेंतर्गत मध्य प्रदेशात 12,000 गावांमधील 1.75 लाख घरांचे लोकार्पण केले.लोकांनी कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन मोदींनी केले आहे.गेल्या 24 तासांत देशात तब्बल 97,570 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

नवी दिल्ली - संपूर्ण जगात कोरोनाचे थैमान सुरू आहे. भारतालाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. कोरोनासंदर्भात लोकांतील बेजबाबदारी मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला सावधान केले आहे. लोकांनी कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. याच बरोबर, कोरोनावर जोपर्यंत औषध उपलब्ध होत नाही, तोपर्यंत सावध राहा. सुरक्षिततेत कसल्याही प्रकारची कसर सोडू नका. जोवर औषध नाही, तोवर सुरक्षिततेचे भाण ठेवा, असे मोदींनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेंतर्गत मध्य प्रदेशात 12,000 गावांमधील 1.75 लाख घरांचे लोकार्पण करून 1.75 लाख कुटुंबांचा गृह प्रवेश करवला. यावेळी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने लाभार्थ्यांशीही संवाद साधला. कोरोनासंदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन करा, असे आवाहन करत, माझे ऐका आणि "जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं, दो गज की दूरी, मास्क है जरूरी." हा मंत्र लक्षात ठेवा. आपली प्रकृती चांगली रहायला हवी, असे मोदी म्हणाले.

गेल्या 24 तासांत देशात तब्बल 97,570 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यानंतर आता शनिवारी एकून कोरोना संक्रमितांचा आकडा वाढून तब्बल 46 लाखांवर गेला आहे. तर आतापर्यंत 36,24,196 जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील कोरना रुग्ण बरे होण्याचा दर आता 77.77 टक्क्यांवर पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आता देशातील कोरना संक्रमितांचा आकडा 46,59,984 वर पोहोचला आहे. तर, गेल्या 24 तासांत 1,201 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत तब्बल 77,472 जणांचा मृत्यू झाला आहे.

देशातील लॉकडाउन संपल्यानंतर, कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जगभरातील नव्या रुग्णांचा विचार करता, भारतातच सर्वाधिक नवे रुग्ण समोर येत आहेत. एकूण कोरोना संक्रमितांच्या संख्येचा विचार करता भारताने आता ब्राझीललाही मागे टाकले आहे. तसेच अमेरिका आणि भारतातील संख्येतील तफावतही सातत्याने कमी होताना दिसत आहे.

भारत अमेरिकेला महिनाभरात मागे टाकणार?आता भारतात कोरोनाचा फैलाव वेगाने होऊ लागला आहे. या साथीचे सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आहेत. त्यानंतर आता दुसऱ्या क्रमांकावर भारत आला आहे. अमेरिका आणि भारताच्या रुग्णसंख्येत २० लाखांचा फरक आहे. भारतात याच वेगाने कोरोना रुग्ण वाढत राहिले, तर 20 दिवस ते महिनाभरात अमेरिकेला मागे टाकत, भारत सर्वाधिक कोरोना रुग्ण संख्येच्या बाबतीत पहिल्या क्रमांकाचा देश बनेल, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या देशात 9,43,480 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे प्रमाण एकूण रुग्णांच्या 20.68 टक्के आहे. सलग दोन दिवस कोरोनाचे 95 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या -

CNG, PNG डिस्ट्रिब्यूटर होण्याची संधी, मोदी सरकार देणार लायसन्स

मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी

कमावण्याची संधी : 'या' IPOमध्ये पैसे गुंतवण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, फक्त 3 तासांतच सुपरहिट!

'या' दोन सरकारी बँकांच्या ग्राहकांसाठी भारी गिफ्ट, एकाच वेळी घेतला मोठा निर्णय

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतmedicineऔषधं