शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

'नो बेगिंग प्लीज'; उपराष्ट्रपती नायडूंची राज्यसभा सदस्यांना पुन्हा सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 5:43 PM

''नो बेगिंग प्लीज'' अशा शब्दांमध्ये उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभा सदस्यांना पुन्हा एकदा वसाहतवादातून आलेले संस्कार विसरा असा संदेश दिला.

ठळक मुद्देमी याचना करतो वगैरे शब्द हे वसाहतवादातून आलेले आहेत असे सांगत या मानसिकतेतून बाहेर या असा संदेश नायडू यांनी दिला होता. त्याचप्रमाणे ही माझी केवळ सूचना आहे असेही ते हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणाले होते.

नवी दिल्ली- ''नो बेगिंग प्लीज'' अशा शब्दांमध्ये उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभा सदस्यांना पुन्हा एकदा वसाहतवादातून आलेले संस्कार विसरा असा संदेश दिला. दैनंदिन कार्यसुचीमध्ये सदस्यांच्या नावासमोर उल्लेख केलेले कागदपत्र सभापटलावर ठेवताना "आय बेग टू ले पेपर्स लिस्टेड अगेन्स्ट माय नेम" असं म्हणण्याची गरज नाही असे नायडू यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीही सांगितले होते. बेग (याचना करतो) असा शब्दप्रयोग वापरण्याऐवजी "आय राइज टू प्रेझेंट द पेपर्स लिस्टेड अगेन्स्ट माय नेम" असे म्हणावे अशी सूचना त्यांनी आज पुन्हा एकदा केली.मी याचना करतो वगैरे शब्द हे वसाहतवादातून आलेले आहेत असे सांगत या मानसिकतेतून बाहेर या असा संदेश नायडू यांनी दिला होता. त्याचप्रमाणे ही माझी केवळ सूचना आहे असेही ते हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणाले होते. आज केंद्रीय कायदा व न्याय राज्यमंत्री पी.पी. चौधरी यांनी "बेग" असा शब्द वापरल्यावर नायडू यांनी आपल्या सल्ल्याची पुन्हा एकदा आठवण करुन दिली. चौधरी यांना " नो बेगिंग प्लीज" असे नायडू यांनी सूचित केले. आय बेग सारखे शब्द टाळण्याची सूचना केली होती तेव्हा कदाचित चौधरी सभागृहात उपस्थित नसावेत असे सांगत, ''फक्त मी पेपर सादर करत आहे असे म्हणावे, "याचना करतो" हा शब्दप्रयोग टाळता आला तर चांगले होईल'' असे उपराष्ट्रपती नायडू यांनी चौधरी यांना सूचित केले. 15 डिसेंबरपासून "बेग" हा शब्द कोणत्याही मंत्री अगर राज्यसभा सदस्याने वापरला नव्हता.

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूRajya Sabhaराज्यसभाParliamentसंसद