शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक होईपर्यंत काँग्रेसवर कारवाई करणार नाही, प्राप्तिकर विभागाची सर्वोच्च न्यायालयात माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 07:49 IST

Congress: काँग्रेसला बजावण्यात आलेल्या सुमारे ३,५०० कोटींची आयकर नोटिशी संदर्भात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दंडात्मक कारवाई करणार नाही, अशी माहिती आयकर विभागाने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दिली.

नवी दिल्ली - काँग्रेसला बजावण्यात आलेल्या सुमारे ३,५०० कोटींची आयकर नोटिशी संदर्भात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दंडात्मक कारवाई करणार नाही, अशी माहिती आयकर विभागाने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दिली. 

न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्या. ए. जी. मसीह यांच्या खंडपीठापुढे सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी आयकर विभागाच्या वतीने बाजू मांडताना या प्रकरणी अंतिम निर्णय होईपर्यंत कारवाई करणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर खंडपीठाने याचिकेवरील सुनावणी जुलै महिन्यापर्यंत पुढे ढकलली.

आयकर विभागाने बजाविलेल्या आयकर नोटिशीविरोधात काँग्रेसने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी पार पडली. सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे आम्ही तूर्तास काँग्रेसविरोधात कारवाई करण्यासाठी पावले उचलणार नाही. परंतु,  या प्रकरणी आयकर विभागाकडे सर्व अधिकार खुले असल्याचे मेहता म्हणाले. काँग्रेसच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांनी न्यायालयात बाजू मांडली. सत्याचा विजय झाल्याचे काँग्रेसचे संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल म्हणाले.

पक्षपाती राजकारणआयकर विभागाने काँग्रेसला बजावलेली नोटीस ही भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या पक्षपाती राजकारणाचे उदाहरण आहे. एकप्रकारे देशातील जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीने केला जात आहे, अशी टीका काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी पक्षाला बजावलेल्या आयकर नोटीसप्रकरणी केली.

टॅग्स :congressकाँग्रेसIncome Taxइन्कम टॅक्सlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४