प्रशासनाविरोधात सांजशोभायात्रा कामोठे एनएमएमटी बससेवेच्या सातत्याची मागणी एनएमएमटी व रिक्षाचालकांचे संगनमत : विलंबाच्या प्रवासाने नागरिक हैराण..!

By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:16+5:302015-03-20T22:40:16+5:30

कामोठेवासीय सांज शोभायात्रेतून निषेध करणार

NMMT and Rickshaw drivers jointly organized by NMMT bus service for the Sanjhshobhayatra Kamosta. | प्रशासनाविरोधात सांजशोभायात्रा कामोठे एनएमएमटी बससेवेच्या सातत्याची मागणी एनएमएमटी व रिक्षाचालकांचे संगनमत : विलंबाच्या प्रवासाने नागरिक हैराण..!

प्रशासनाविरोधात सांजशोभायात्रा कामोठे एनएमएमटी बससेवेच्या सातत्याची मागणी एनएमएमटी व रिक्षाचालकांचे संगनमत : विलंबाच्या प्रवासाने नागरिक हैराण..!

मोठेवासीय सांज शोभायात्रेतून निषेध करणार
कामोठे : खांदेश्वर व मानसरोवर या ठिकाणी सुरू असलेल्या एनएमएमटी बससेवेमध्ये अनियमितता आल्याने येथील प्रवासी संतप्त झाले असून शनिवारी गुढी पाडव्याच्या दिवशी सांज शोभायात्रेतून एनएमएमटी प्रशासनाचा निषेध करण्यात येणार आहे. सिटीजन फोरम आणि कामोठे फोरम या संस्थांच्या माध्यमातून सांज शोभा यात्रा काढण्यात येणार आहे.
मानसरोवर रेल्वे स्थानक ते शिवसेना शाखेपर्यंत कामोठेकर सांज शोभायात्रेतून पायी चालत जाणार आहेत. या अनोख्या आंदोलनाने झोपलेल्या सरकारला जागे करण्याचा रहिवाशांच्या प्रयत्न असल्याचे सिटीझन युनिटी फोरमचे प्रमुख अरु ण भिसे यांनी लोकमतला सांगितले. सुरूवातीला दहा मिनिटांनी सुटणारी बससेवा आता अर्धा तासाने सुटत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत असून रिक्षेने प्रवास करावा लागत आहे. एनएमएमटी आणि रिक्षाचालकांमध्ये साटेलोटे असल्याने बसेस जाणुनबुजून उशीराने सोडल्या जात असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. दरम्यान एनएमएमटी प्रशासनाशी या प्रकरणी बोलणी करणार असल्याचे कामोठ्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक एस.जी. मुल्लेमवार यांनी सांगितले. बसच्या कमतरतेमुळे अर्धा तासाने बस सोडल्या जात असून जादा बसेसबाबत वरीष्ठांशी चर्चा केली जाईल, असे एनएमएमटीच्या कामोठे विभागाचे व्यवस्थापक संजय माळवे यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: NMMT and Rickshaw drivers jointly organized by NMMT bus service for the Sanjhshobhayatra Kamosta.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.