सुरेश एस. डुग्गर लोकमत न्यूज नेटवर्कजम्मू : श्रीनगरच्या नौगाम पोलिस ठाण्यात हरयाणातील फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचे नमुने घेण्याचे काम सुरू असताना त्यांचा स्फोट झाल्यामुळे नऊ जणांचा मृत्यू झाला. तर, ३२ जण जखमी झाले. श्रीनगरच्या नौगाम पोलिस ठाण्यामध्ये शुक्रवारी रात्री ११ वाजून २० मिनिटांनी झालेल्या या दुर्घटनेतील मृतांमध्ये बहुतांश पोलिस कर्मचारी असून, एक नायब तहसीलदार आणि स्थानिक टेलरचा समावेश आहे. हा दहशतवादी हल्ला नसून अपघाताने स्फोट झाला असल्याचे जम्मू आणि काश्मीरचे पोलिस महासंचालक नलिन प्रभात यांनी शनिवारी सांगितले.
जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हा स्फोट इतका जबरदस्त होता की काही मृतदेहांचे अवयव पोलिस स्टेशनपासून सुमारे १०० ते २०० मीटर दूरपर्यंत उडाले. या परिसरातील घरांतून हे अवयव ताब्यात घेण्यात आले आहेत.
काही जण १०० टक्के जळाल्याने त्यांच्या मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. जखमींना उपचारासाठी श्रीनगरमधील आर्मी ९२ बेस रुग्णालय व अन्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. तर काही जणांवर स्थानिक खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या स्फोटाच्या ठिकाणी सुरक्षा दलाच्या श्वानपथकाद्वारेदेखील पाहणी करण्यात आली.
Web Summary : Nine people died, and 32 were injured in a blast at Nowgam police station in Srinagar during explosive sample collection. The deceased include police personnel, a Tehsildar, and a tailor. Police confirm it was accidental, not a terror attack. Investigations are ongoing.
Web Summary : श्रीनगर के नौगाम पुलिस स्टेशन में विस्फोटक नमूनों के संग्रह के दौरान विस्फोट में नौ लोगों की मौत हो गई, 32 घायल हो गए। मृतकों में पुलिस कर्मी, नायब तहसीलदार और एक दर्जी शामिल हैं। पुलिस ने पुष्टि की कि यह एक दुर्घटना थी, आतंकवादी हमला नहीं। जांच जारी है।