नितीश-लालूंचा भाजपावर हल्ला
By Admin | Updated: August 12, 2014 02:02 IST2014-08-12T02:02:08+5:302014-08-12T02:02:08+5:30
गेल्या वीस वर्षांचा वैरभाव विसरून आज राजदचे सुप्रीमो लालूप्रसाद यादव व जदयूचे नेते नितीशकुमार यांनी एकाच व्यासपीठावरून भाजपावर टीकेचा भडिमार केला

नितीश-लालूंचा भाजपावर हल्ला
पाटणा : गेल्या वीस वर्षांचा वैरभाव विसरून आज राजदचे सुप्रीमो लालूप्रसाद यादव व जदयूचे नेते नितीशकुमार यांनी एकाच व्यासपीठावरून भाजपावर टीकेचा भडिमार केला. धर्माच्या नावावर समाजाचे तुकडे करणे तसेच महागाई रोखण्याची व युवकांना रोजगार देण्याची केलेली आश्वासने न पाळल्याचा आरोप त्यांनी भाजपावर केला.
बिहार विधानसभेच्या दहा जागांसाठी येत्या २१ आॅगस्ट रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. त्यातील एक असलेल्या हाजीपूर मतदारसंघातून जदयू-राजद-काँग्रेस युतीचे उमेदवार राजेंद्र राय यांच्या प्रचारसभेत नितीश-लालूद्वय
बोलत होते. नितीशकुमार व लालूप्रसाद हे एकमेकांचे कट्टर विरोधक आज केवळ व्यासपीठावरच एकत्र बसले नाही, तर त्यांनी एकमेकांची गळाभेटही घेतली
आणि दोघांनी हात उंचावून आपल्या मैत्रीची साक्ष उपस्थितांना जाणवून दिली. (वृत्तसंस्था)