Nitish Kumar: बिहार विधानसभेतील वादावर अध्यक्षांनी मौन सोडलं, नाव न घेताच खडसावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 06:49 PM2022-03-16T18:49:18+5:302022-03-16T18:51:16+5:30

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानसभा अध्यक्षांवर आरोप केल्यानंतर मंगळवारी विधानसभा सभागृह सुरु झाल्यानंतरही अध्यक्ष विजय कुमार सिन्हा स्वत: आले नाहीत.

Nitish Kumar: The President remained silent on the controversy in the Bihar Legislative Assembly by vijay kumar sinha | Nitish Kumar: बिहार विधानसभेतील वादावर अध्यक्षांनी मौन सोडलं, नाव न घेताच खडसावलं

Nitish Kumar: बिहार विधानसभेतील वादावर अध्यक्षांनी मौन सोडलं, नाव न घेताच खडसावलं

googlenewsNext

नवी दिल्ली - बिहारमध्ये सोमवारी मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आणि विधानसभा अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मित्र पक्ष भारतीय जनता पार्टीच्या कोट्यातून असलेले विधानसा अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांना घटनाबाह्य सभागृहाचं कामकाज चालवत असल्याचा आरोप केला. नितीश कुमार यांनी सदनातच आक्रमक पवित्रा घेतल्याने त्यांच्या जेडीयू पक्षाच्या आमदारांनीही भाजपाविरोधात उघडपणे भाष्य केले. याप्रकरणी आता विधानसभा अध्यक्षांनी नाव न घेता सर्वांनाच सुनावलं.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानसभा अध्यक्षांवर आरोप केल्यानंतर मंगळवारी विधानसभा सभागृह सुरु झाल्यानंतरही अध्यक्ष विजय कुमार सिन्हा स्वत: आले नाहीत. सदनाची कार्यवाही करण्यासाठी भाजपा आमदार प्रेम कुमार तालिका अध्यक्षपदावर बसले होते. त्यावेळी, सभागृह सुरू झाल्यानंतर आरजेडी आमदारांनी मुख्यमंत्रीविरुद्ध विधानसभा अध्यक्ष मुद्दा उपस्थित करत गोंधळ घातला. त्यानंतर, विधानसभा अध्यक्षांनी आज सभागृहात येताच सर्वांनाच फैलावर घेतले. 

गेल्या काही दिवसांत सदनामध्ये जे काही घडलं ते या सभागृहाचं पावित्र्य जपण्याच्या अनुषंगाने योग्य नाही. आपला आज उद्याच्या पिढीचा इतिहास आहे. आपले आजचे आचरण आणि व्यवहार हा इतिहासाचा हिस्सा बनतो, तेव्हा आपण तो बरोबर की चूक हे सांगायला हजरही नसू. त्यामुळेच, आपण सद्यस्थितीला नियम, कायदा आणि मर्यादेच्या सीमारेषेत ठेवूयात. तरच, येणार काळ आपल्याला लक्षात ठेवेल आणि आपल्यावर नजर चुकविण्याची वेळ येणार नाही, असे विजय कुमार सिन्हा यांनी म्हटले. दरम्यान, यावेळी, सिन्हा यांनी नितीशकुमार यांचं नाव न घेता त्यांच्यावरही अप्रत्यक्ष टोला मारला.    

बिहारमध्ये भाजप अन् जेडीयू आमने-सामने

जेडीयू आणि भाजपा आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे एनडीएच्या या घटक पक्षांमधील वाद चव्हाट्यावर आले आहेत. जेडीयूचे प्रवक्ते जाहीरपणे भाजपाविरोधात भाष्य करत आहेत. सोशल मीडियावरही दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांविरोधात हल्लाबोल करत आहेत. जेडीयू प्रवक्ते अजय आलोक यांनी भाजपाला इशारा देताना म्हटलं की, उत्तर प्रदेश विधानसभेत भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या विजयामुळे त्यांच्या नेत्यांमध्ये अतिआत्मविश्वास आला आहे, तो योग्य नाही. तसेच काठी इतकीही वाकवू नका जेणेकरून ती मोडेल. कारण ही काठी मोडली तर तुटेल आणि सगळं काही संपेल. त्याचा गंभीर परिणाम भोगावा लागेल. इतक्यावरच जेडीयू प्रवक्ते थांबले नाहीत तर पुढे म्हणाले की, आत्मविश्वास चांगला आहे परंतु अतिआत्मविश्वास विनाशाचं कारण बनतो. भाजपानं त्यांची रणनीती बदलली नाही तर जेडीयू आणि भाजपा आघाडी जास्त दिवस टिकणार नाही, असा इशाराच जेडीयू प्रवक्ते अजय आलोक यांनी दिला आहे.

Web Title: Nitish Kumar: The President remained silent on the controversy in the Bihar Legislative Assembly by vijay kumar sinha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.