शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

20 महिन्यांतच फुटला महागठबंधनाचा फुगा, भाजपा ठरणार किंगमेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2017 9:34 PM

राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांची भेट घेऊन त्यांनी संध्याकाळी आपला राजीनामा सुपूर्द केला. यासोबतच भाजपाला रोखण्यासाठी एकत्र आलेले जेडीयू-आरजेडी-काँग्रेस यांच्या महागठबंधनाचा अंत झाल्याचं मानलं जात आहे.

ठळक मुद्देमहागठबंधन तुटल्याने नितीश कुमार यांना जर पुन्हा सरकार स्थापन करायचं असेल तर त्यांना भाजपाची मदत घेण्याशिवाय आता पर्याय नाहीये.   243 जागा असलेल्या बिहार विधानसभेत बहुमतासाठी 122 जागा मिळवणं गरजेचं आहे. नितीशकुमार भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत गेल्यास जदयूच्या 71 आणि भाजपाच्या 53 मिळून दोघांच्या 124  जागा होतील. 

पाटणा, दि. 26 - बिहारमध्ये मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी राजीनामा देऊन मोठा राजकीय भूकंप केला आहे. राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांची भेट घेऊन त्यांनी संध्याकाळी आपला राजीनामा सुपूर्द केला. यासोबतच भाजपाला रोखण्यासाठी एकत्र आलेले जेडीयू-आरजेडी-काँग्रेस यांच्या महागठबंधनाचा अंत झाल्याचं मानलं जात आहे. केवळ 20 महीन्यातच बिहारमधील जेडीयू-आरजेडी-काँग्रेस महाआघाडी तुटली आहे. आता नवं सरकार स्थापन करण्यावर विचार-मंथन केलं जाईल. यामध्ये भाजपाची भूमिका महत्वाची ठरणार आहे. कारण आता बिहारमध्ये भाजपाच्या मदतीशिवाय सरकार बनवणं अशक्य आहे. नितीश यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. त्यामुळे भाजपाकडून ऑफर मिळाल्यानंतर बिहारमधील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणजेच भाजपा किंगमेकर बनण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बिहार विधानसभा निवडणुकांनंतर भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी राष्ट्रीय जनता दल (राजद), जनता दल यूनायटेड (जदयू)  आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन महागठबंधनचं सरकार स्थापन केलं होतं. 243 सदस्य असलेल्या बिहार विधानसभेत बहुमतासाठी 122 आकडा गाठणं गरजेचं होतं. त्यामुळे 80 जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आलेला लालू प्रसाद यादवांचा राजद, 71 जागा मिळवून दुसरा मोठा पक्ष असलेला नितीश कुमारांचा जदयू आणि 27 जागा मिळवणा-या कॉंग्रेसने एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. सर्वात मोठा पक्ष असतानाही मुख्यमंत्रीपद आपल्याकडे न ठेवता लालूंनी नितीश कुमारांना मुख्यमंत्री बनवलं आणि आपला मुलगा तेजस्वी यादवा याला त्यांनी उपमुख्यमंत्री बनवलं. महाआघाडी तुटण्याचं जेव्हा-केव्हा वृत्त आलं त्यावेळी लालू प्रसाद यादव यांनी ही चर्चा वायफळ असल्याचे म्हटले होते. महाआघाडी तुटण्याचा प्रश्नच नसल्याचं ते वारंवार म्हणाले होते. 

मात्र,  भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी राजीनामा द्यावा यासाठी नितीश कुमार यांच्यावरील दबाव सातत्याने वाढत होता.  पण, तेजस्वीचा राजीनामा घेण्यास राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी आडकाठी केल्यानंतर नितीश नाराज झाले होते. तेजस्वी यादव यांचा राजीनामा घेण्यात अपयशी ठरत असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला.  

बिहार विधानसभेत असं बदलू शकतं गणित...महागठबंधन तुटल्याने नितीश कुमार यांना जर पुन्हा सरकार स्थापन करायचं असेल तर त्यांना भाजपाची मदत घेण्याशिवाय आता पर्याय नाहीये.    243 जागा असलेल्या बिहार विधानसभेत बहुमतासाठी 122 जागा मिळवणं गरजेचं आहे. नितीशकुमार भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत गेल्यास जदयूच्या 71 आणि भाजपाच्या 53 मिळून दोघांच्या 124  जागा होतील. 

बिहार विधानसभेतील पक्षीय बलाबल (एकूण 243 सदस्य)राष्ट्रीय जनता दल (राजद) – 80जनता दल यूनायटेड (जदयू) – 71काँग्रेस – 27भाजप (विरोधी पक्ष) – 53सीपीआय – 3लोक जनशक्ती पार्टी – 2राष्ट्रीय लोक समता पार्टी – 2हिंदुस्तानी अवाम मोर्चा – 1अपक्ष – 4