शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

नितीश कुमार यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करा, भाजपाच्या मित्रपक्षाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 21:44 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी जोरदार प्रचार करत आहेत.

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी जोरदार प्रचार करत आहेत. परंतु वृत्तवाहिन्यांनी केलेला सर्व्हे आणि हाती आलेल्या कलचाचणीवरून भाजपाला पूर्ण बहुमत मिळणं कठीण असल्याचं दिसतंय. त्यातच आता भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या जनता दल युनायटेड(जेडीयू)चे वरिष्ठ नेते आणि आमदार गुलाम रसूल बलियावी यांनी नितीश कुमार यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवण्याची मागणी केली आहे. मोदींना बहुमत न मिळाल्यास आणि मित्र पक्षांच्या मदतीनं एनडीएचं सरकार आल्यास नितीश कुमार यांना पंतप्रधान करावं, असं गुलाम रसूल बलियावी म्हणाले आहेत.बिहारचे प्रमुख मुस्लिम नेते बलियावी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना हे विधान केलं आहे. राज्यात मोदींच्या चेहऱ्यानं नव्हे, तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या चेहऱ्याकडे पाहून काम करतोय. त्यामुळेच बिहारमधली जनता एनडीएला मतदान करतेय. या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना बहुमत मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे नितीश कुमार यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करा’, अशी मागणी गुलाम रसूल बलियावी यांनी केली.बलियावी यांच्या मागणीवर भाजपकडून अद्याप कोणीही बोललेलं नाही. मात्र या मागणीमुळे भाजपा व जदयूमध्ये पुन्हा दुरावा निर्माण होऊ शकतो, अशीही शक्यता आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपाने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर केल्यामुळे नितीश कुमार हे भाजपाची साथ सोडत एनडीएमधून बाहेर पडले होते.  त्यावेळीही नितीश यांना पंतप्रधान पदाची उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती,  अशीही चर्चा होती. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNitish Kumarनितीश कुमार