शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

Nitish Kumar Delhi Visit: 'विरोधक एकवटणार; भाजपविरोधात तिसरी आघाडी नाही तर मुख्य आघाडी तयार होणार': नितीश कुमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 21:09 IST

Nitish Kumar Delhi Visit: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या दिल्ली दौऱ्यात विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या.

Nitish Kumar Delhi Visit: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिल्ली दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी तिसर्‍या आघाडीची शक्यता फेटाळून लावली. ते म्हणाले की, 'आता देशात तिसरी आघाडी नाही, तर मुख्य आघाडी स्थापन केली जाईल'. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार विरोधी नेत्यांच्या भेटी घेत आहेत. तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर त्यांनी राहुल गांधी, शरद पवार यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या. 

मुख्य आघाडी होणारविरोधी पक्षांच्या एकजुटीबाबत नितीश कुमार म्हणाले की, 'विविध पक्षाच्या नेत्यांकडून भेटण्यासाठी फोन यायचे, म्हणूनच दिल्लीत आलो. सर्वांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधक एकवटत आहेत. लोकसभेत तिसरी आघाडी नाही, तर मुख्य आघाडी स्थापन होईल.' 

अटल बिहारी यांचे कौतुकयावेळी माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव घेत नितीश कुमारांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, 'अटलबिहारी वाजपेयींच्या सहा वर्षात किती कामे झाली आणि चालू कार्यकाळात एकही नवीन काम झाले नाही. प्रत्येक गोष्टीला नावं ठेवणं आणि काम न करता प्रचार करणं, काम न करता फक्त प्रसिद्धी मिळवायची, ही काही लोकांची सवय आहे. सर्वांना एकत्र आणणे हे आमचे काम आहे. परस्पर सहमतीनंतर सर्व काही ठरवले जाईल.'

ते पुढे म्हणाले की, 'काँग्रेस, डावे किंवा इतर पक्ष, सर्व महत्त्वाचे आहेत. प्रत्येकजण आम्हाला प्रतिसाद देत आहे. सर्वांनी सहमती दर्शवली तर खूप चांगले वातावरण निर्माण होईल. अनेक पक्षांचे लोक एकत्र येणार आहेत, त्यावर आमचे काम सुरू आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचाही फोन आला होता, त्यादेखील आमच्यासोबत येतील,' असंही ते म्हणाले. 

या नेत्यांच्या भेटी घेतल्या दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी, सीपीआय-एम नेते सीताराम येचुरी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला, सीपीआय-एमएलचे सरचिटणीस दीपंकर भट्टाचार्य आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी यांची भेट घेतली. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाcongressकाँग्रेस