सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशी घरे बांधा नितीन गडकरींचे आवाहन : वाशीमध्ये मालमत्ता प्रदर्शनाचे उद्घाटन

By Admin | Updated: December 14, 2014 00:07 IST2014-12-12T23:49:09+5:302014-12-14T00:07:48+5:30

नवी मुंबई : बांधकाम व्यावसायिकांनी अत्याधुनिक साधनांचा वापर करून बांधकामांवर होणारा खर्च कमी करावा. सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा घरांची निर्मिती करावी. एकाच प्रकल्पामध्ये श्रीमंत होण्याचा विचार करू नये, असे मत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.

Nitin Gadkari urges people to get affordable housing: Opening of Property Exposition in Vashi | सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशी घरे बांधा नितीन गडकरींचे आवाहन : वाशीमध्ये मालमत्ता प्रदर्शनाचे उद्घाटन

सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशी घरे बांधा नितीन गडकरींचे आवाहन : वाशीमध्ये मालमत्ता प्रदर्शनाचे उद्घाटन

नवी मुंबई : बांधकाम व्यावसायिकांनी अत्याधुनिक साधनांचा वापर करून बांधकामांवर होणारा खर्च कमी करावा. सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा घरांची निर्मिती करावी. एकाच प्रकल्पामध्ये श्रीमंत होण्याचा विचार करू नये, असे मत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.
वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये बिल्डर्स असोसिएशन ऑफ नवी मुंबईच्यावतीने १५ व्या मालमत्ता प्रदर्शनाचे गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी ते म्हणाले की, ५० लाख ते १ कोटी रुपये किमतीची घरे खरेदी करण्याची क्षमता फक्त १ ते २ टक्के नागरिकांमध्ये आहे. यामुळे अनेक इमारती बांधून झाल्या असून घरांची विक्री होत नाही. देशात अनेक शहरांमध्ये मंदीचे वातावरण आहे. यामुळे व्यावसायिकांनी महागडे प्रकल्प उभे करण्यापेक्षा सामान्य नागरिकांना परवडतील अशा घरांची निर्मिती करावी. तसेच व्यवसायामध्ये पारदर्शीपणा असला पाहिजे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
नवी मुंबईतील कोळी बांधवांसाठी छोटेसे बंदर विकसीत करण्याची मागणी यावेळी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी गडकरी यांच्याकडे केली. तर महापौर सागर नाईक यांनी महापालिकेच्यावतीने देण्यात येणार्‍या सुविधांविषयी माहिती दिली. यावेळी बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष देवांग त्रिवेदी, आमदार सुधाकर भालेराव, माजी मंत्री गणेश नाईक, माजी खासदार रामशेठ ठाकूर, संजीव नाईक, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया, बांधकाम व्यावसायिक सुरेश हावरे, धर्मेंद्र कारीया, वसंत भद्रा, रसिक चौहाण, एम. सी. सनी, मनीष भटीजा, हेमंत लखाणी, हरेश छेडा, ए.आर.खत्री उपस्थित होते.

चौकट
राज्यात जलवाहतुकीस प्राधान्य
केंद्र शासनाच्यावतीने राज्यात राबविण्यात येणार्‍या योजनांविषयी माहिती देताना नितीन गडकरी म्हणाले की, मुंबई - गोवा महामार्गाचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. तसेच तीन बंदरे विकसित करण्याचा मानस आहे. बीपीटीमध्ये पॅसेंजर टर्मिनल उभारण्यात येणार आहे. सीप्लेन भारतामध्येच बनविण्याविषयी विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. जेएनपीटीमधील सेझमध्ये जवळपास दीड लाख रोजगार उपलब्ध करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. समुद्रमार्गे वाहतूक वाढविण्यास प्राधान्य देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
----
मंदाताईंची कोपरखळी
आमदार मंदा म्हात्रे त्यांच्या भाषणात म्हणाल्या की, माजी आमदार असल्यामुळे गत वर्षी मला खाली बसावे लागले होते. तेव्हा मी म्हणाले होते की, पुढील वर्षी तुम्हाला माझे नाव आमंत्रण पत्रिकेवर टाकावे लागेल व सन्मानाने व्यासपीठावर बसवावे लागेल. या वर्षी आमदार असल्याने सन्मानाने व्यासपीठावर आले. प्रत्येकाचे दिवस बदलत असतात, अशी कोपरखळी त्यांनी या वेळी मारली.
-----
फोटो

बिल्डर चौकट नावाने दुसरी फाईल टाकत आहे

Web Title: Nitin Gadkari urges people to get affordable housing: Opening of Property Exposition in Vashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.