Nitin Gadkari : ‘आयएएसची पाऊलवाट’ पुस्तकाचे गडकरींच्या हस्ते प्रकाशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 00:39 IST2021-04-14T00:39:35+5:302021-04-14T00:39:58+5:30
Nitin Gadkari : २००७ च्या मध्यप्रदेश केडरचे आयएएस अधिकारी संकेत भोंडवे यांच्या ‘आयएएसची पाऊलवाट’ या पुस्तकाच्या सातव्या आवृत्तीचे आभासी प्रकाशन मंगळवारी गडकरी यांच्या हस्ते झाले.

Nitin Gadkari : ‘आयएएसची पाऊलवाट’ पुस्तकाचे गडकरींच्या हस्ते प्रकाशन
नवी दिल्ली : सनदी अधिकारी संकेत भोंडवे यांचे ‘आयएएसची पाऊलवाट-भारतीय प्रशासकीय सेवेचा एक दशकाचा प्रवास’ हे पुस्तक मराठी आयएएस टक्का वाढविणारे ठरेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. २००७ च्या मध्यप्रदेश केडरचे आयएएस अधिकारी संकेत भोंडवे यांच्या ‘आयएएसची पाऊलवाट’ या पुस्तकाच्या सातव्या आवृत्तीचे आभासी प्रकाशन मंगळवारी गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी गडकरी यांनी अन्य राज्यांच्या तुलनेत आयएएस, आयपीएस मराठी अधिकारी कमी असल्याची खंत व्यक्त केली.
संकेत भोंडवे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मराठी मुलांना अचूक मार्गदर्शन व्हावे म्हणून मी हे पुस्तक लिहायला घेतले.