गडकरी लवकरच मोठी घोषणा करणार?; वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार, प्रदूषण घटणार, पैसेही वाचणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 10:01 AM2020-08-26T10:01:20+5:302020-08-26T10:21:51+5:30

देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं आधुनिकीकरण केलं जाणार असल्याचं संकेत

Nitin Gadkari calls for adopting advanced models, use of biofuel, electricity, CNG in public transport | गडकरी लवकरच मोठी घोषणा करणार?; वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार, प्रदूषण घटणार, पैसेही वाचणार

गडकरी लवकरच मोठी घोषणा करणार?; वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार, प्रदूषण घटणार, पैसेही वाचणार

Next

नवी दिल्ली: देशातील वाढतं प्रदूषण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतल्या समस्या दूर करण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी लवकरच महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या आधुनिकीकरणाचे संकेत गडकरींनी दिले आहेत. नव्या वाहतूक व्यवस्थेत सीएनजी, इलेक्ट्रिक वाहनांवर भर असेल. यामुळे इंधनाची बचत होईल. त्यामुळे वाहतूक खर्च कमी होईल. याशिवाय प्रदूषणही रोखता येईल.

..अन् गडकरींनी 'ते' शब्द खरे करून दाखवले; चीनला जबरदस्त दणका

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळे खर्च कमी होईल. अक्षय ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावर भर दिला जाईल, अशी माहिती गडकरींनी दिली. इलेक्ट्रिक, सीएनजीवर चालणाऱ्या गाड्यांचा वापर झाल्यास खनिज तेलाची आयात कमी होईल. त्यामुळे बराचसा खर्च वाचेल, असंदेखील ते पुढे म्हणाले. यावेळी त्यांनी नागपूरमध्ये करण्यात आलेल्या प्रयोगांचा विशेष उल्लेख केला. 'नागपुरात ४५० बसेस जैवइंधनावर धावणार आहेत. तशी योजना आखण्यात आली आहे. त्यातील ९० बसेस जैवइंधनावर धावू लागल्या आहेत,' अशी माहिती त्यांनी दिली.

...तर देशात 5 कोटी नोकऱ्या तयार होतील आणि हेच आमचं लक्ष्य; गडकरींनी सांगितला सरकारचा प्लॅन

जैवइंधनावर धावणाऱ्या बसेसमुळे मोठ्या प्रमाणात पैशांची बचत होत असल्याचं गडकरींनी सांगितलं. 'डिझेलवर चालणाऱ्या बसेसवर वर्षाकाठी ६० कोटींचा खर्च येतो. सीएनजीवर चालणाऱ्या बसेसमुळे आर्थिक बचत होते. याशिवाय सांडपाण्यापासून सीएनजी तयार करता येतो का, यावरही काम सुरू आहे,' अशी माहिती त्यांनी दिली. 

ग्रीन हायवेजच्या बाजूने जाणार हायस्पीड ट्रेन, दिल्ली-मुंबई, मुंबई-नागपूरचा समावेश

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी लंडन बस मॉडेल राबवण्याची आवश्यकता असल्याचं गडकरी म्हणाले. बस सेवा देणाऱ्यांनी डबल डेकर बस चालवाव्यात. त्यात आधुनिक सुविधा द्याव्यात. त्यामुळे प्रवासी संख्या वाढण्याची शक्यता वाढेल, असं गडकरींनी म्हटलं.

४०० वर्ष जुना वटवृक्ष वाचवण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचा नकाशा बदलला; मंत्री नितीन गडकरींचे आदेश

Web Title: Nitin Gadkari calls for adopting advanced models, use of biofuel, electricity, CNG in public transport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.