धुळ्याचे नितीन चौधरी वकील परिषदेचे अध्यक्ष
By Admin | Updated: May 11, 2014 00:04 IST2014-05-11T00:04:16+5:302014-05-11T00:04:16+5:30
बिनविरोध निवड : महाराष्ट्र व गोव्याचा कार्यभार

धुळ्याचे नितीन चौधरी वकील परिषदेचे अध्यक्ष
ब नविरोध निवड : महाराष्ट्र व गोव्याचा कार्यभारधुळे : बार असोसिएशनचे सदस्य ॲड. नितीन चौधरी यांची महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी नागपूरचे अनिल गोवरदिपे यांची नियुक्ती झाली आहे.मुंबई येथील बार कौन्सिलच्या सभागृहात दुपारी निवड प्रक्रियेस सुरुवात झाली. त्यात धुळे येथील रहिवासी ॲड. चौधरी यांची निवड झाली. ते पूर्वी महाराष्ट्र व गोवा बार कौन्सील म्हणजेच राज्य वकील परिषदेचे उपाध्यक्षही होते. १९६१ पासूनच्या या इतिहासात सर्वाधिक कमी वयाचे म्हणजे ३९ व्या वर्षी ॲड. चौधरी राज्य वकील परिषदेचे अध्यक्ष झाले आहेत. राज्य वकील परिषदेत २५ सदस्य असतात आणि महाराष्ट्राचे व गोव्याचे ॲडव्होकेट जनरल पदसिद्ध सदस्य असल्याने २७ सदस्यांची ही परिषद असते. महाराष्ट्र व गोवा मिळून दीड लाख वकील आहेत. दरम्यान, निवडीनंतर त्यांनी मावळते अध्यक्ष ॲड.आशिष देशमुख (पुसद) यांच्याकडून अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला.