शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

निर्मला सितारमण यांची अर्थसंकल्पीय बॅटींग म्हणजे ऑस्ट्रेलियातील 'ऑल आऊट 36'

By महेश गलांडे | Published: February 02, 2021 1:25 PM

अर्थमंत्री निर्माला सीतारामन यांनी सोमवारी बजेट सादर केला. त्यांनी यावेळी सांगितले की, ''मागील वर्ष हे सर्वांसाठी आव्हानात्मक ठरले. भारतीयांनी या संकटाचाही धैर्यानं सामना केला.

ठळक मुद्देऑस्ट्रेलियातील अॅडलेड कसोटीतील टीम इंडियाचा दुसरा डाव ३६ धावांत गडगडला होता. भारत ०-१ असा पिछाडीवर होता, त्यावेळी भारतीय संघाची मोठी नाचक्की झाली होती.

नवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी देशाचा 2021 सालचा अर्थसंकल्प सोमवारी सादर केला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य खात्यासाठी लक्षणीय 137 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. सितारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वागत केलं असून देशाला आत्मनिर्भर बनविणारा हा अर्थसंकल्प असल्याचं त्यांनी म्हटलंय. भाजपा नेते आणि सत्ताधारी पक्षांकडून या अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यात येत आहे. तर, विरोधकांनी मोदी सरकार आणि अर्थमंत्र्यांना लक्ष्य केलंय. विशेष म्हणजे निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्पात टीम इंडियाच्या विजयाचे कौतुक केले होते. मात्र, निर्मला सितारमण यांची बॅटींग म्हणजे ऑल आऊट 36 अशी असल्याची टीका काँग्रेसने केलीय. 

अर्थमंत्री निर्माला सीतारामन यांनी सोमवारी बजेट सादर केला. त्यांनी यावेळी सांगितले की, ''मागील वर्ष हे सर्वांसाठी आव्हानात्मक ठरले. भारतीयांनी या संकटाचाही धैर्यानं सामना केला. भारताच्या अर्थव्यवस्थेवरही या संकटाचा परिणाम झाला, परंतु त्यातूनही आपण चांगले पुनरागमन केलं आहे. टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानं भारतातील प्रत्येकाला त्यांच्यात असलेल्या ताकदीची आठवण करून दिली.'', असे अर्थमंत्र्यांनी बजेट सादर करताना म्हटलं होतं. यासंदर्भात काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना प्रश्न विचारण्यात आला होता. सितारमण यांची अर्थसंकल्पातील बॅटींग कशी होती?. त्यावर, चिदंबरम यांनी मजेशीर उत्तर दिलंय.   

ऑस्ट्रेलियातील अॅडलेड कसोटीतील टीम इंडियाचा दुसरा डाव ३६ धावांत गडगडला होता. भारत ०-१ असा पिछाडीवर होता, त्यावेळी भारतीय संघाची मोठी नाचक्की झाली होती. सर्वच स्तरातून भारतीय संघावर टीका करण्यात येत होती. त्यामुळे, चिदंबरम यांनी निर्मला सितारमण यांची बॅटींगही अॅडलेड कसोटीतील ऑल आऊट 36 प्रमाणे होती, असे म्हटंलय. एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना चिदंबरम यांनी अर्थसंकल्पावर टीका केलीय. 

Budget 2021, Nirmala Sitharaman: मागे पडलेल्यांनी जिंकून दाखवलं; टीम इंडियाच्या पराक्रमाचं उदाहरण वित्तमंत्री देतात तेव्हा...

अॅडलेड कसोटीनंतर संकटात असलेल्या टीम इंडियाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेनं सक्षमपणे सांभाळून सर्वांची मनं जिंकली. मेलबर्न कसोटीत खणखणीत शतक झळकावून त्यानं अन्य सहकाऱ्यांसमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवले. त्यानंतर युवा गोलंदाजांच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहून त्यांच्याकडून चांगली कामगिरी करून घेतली. रवींद्र जडेजामुळे धावबाद झाल्यानंतरही रागावण्याऐवजी अजिंक्य त्याच्याजवळ गेला आणि त्याला हताश होऊ नको, असा सल्ला दिला. शुबमन गिल, रिषभ पंत, टी नटराजन, शार्दूल ठाकूर, वॉशिंग्टन सूंदर, मोहम्मद सिराज यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.  टीम इंडियानं मालिका जिंकली

कोरोना व्हायरसमुळे २०२० हे वर्ष लॉकडाऊनमध्येच गेलं आणि त्यात प्रत्येकाचं आयुष्यच लॉक करून टाकलं. मात्र, हळू हळू अनलॉक सुरु होताच क्रिकेटनं प्रत्येकाच्या आयुष्यात संजीवनीरुपी एन्ट्री घेतली. आपापल्या घरातच अडकून पडलेल्यांच्या चेहऱ्यावर सुरुवातीला इंडियन प्रीमिअर लीगनं ( IPL 2020) आणि त्यानंतर भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेनं ( India vs Australia) हास्य फुलवले. ऑस्ट्रेलियातील मालिकेनं प्रत्येकाला आयुष्यातील खूप मोठा अन् महत्त्वपूर्ण अर्थ समजावून सांगितला. या मालिकेतील पहिल्या कसोटीत टीम इंडिया सर्वात निचांक धावसंख्येवर तंबूत परतली आणि त्यानंतर एकदम फिनिक्स भरारी घेताना २-१ अशा फरकाने मालिका जिंकली. त्यामुळेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी बजेट ( Budget 2021) सादर करताना भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचा उल्लेख केला.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनcongressकाँग्रेसchidambaram-pcचिदंबरम