शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
2
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
3
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७८ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
4
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
5
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
6
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
7
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
8
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
9
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
10
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
11
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
12
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
13
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
14
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
15
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
16
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
17
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
18
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
19
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
20
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...

देशाच्या तिजोरीची किल्ली प्रथमच महिलेकडे, मोदींचा ऐतिहासिक निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 17:23 IST

इंदिरा गांधी यांनीही अर्थमंत्रीपद सांभाळलं होतं, पण...

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा काल शपथविधी पार पडला. यानंतर आज मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले. यामध्ये माजी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

इंदिरा गांधी यांच्यानंतर देशातील संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणाऱ्या निर्मला सीतारमण यांनी पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या सरकारमध्ये अर्थमंत्री बनविण्यात आले आहे. त्यामुळे त्या देशातील पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री बनल्या आहेत. याआधी इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान असताना 1970 ते 1971च्या दरम्यान अर्थमंत्रालयाचा अतिरिक्त कारभार सांभाळला होता. त्यामुळे निर्मला सीतारामण यांनी देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री म्हणून पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. 

दरम्यान, सुरुवातीला निर्मला सीतारामन या भाजपा प्रवक्त्या म्हणून देशासमोर आल्या. मोदी सरकार -1 मध्ये त्यांनी संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी चांगले काम केले. त्यांचा पदव्युत्तर अभ्यासात आंतरराष्ट्रीय व्यापार हा त्यांचा संशोधनाचा विषय होता. अर्थशास्त्रात त्यांना गती आहे. त्यांचे भाषेवर प्रभुत्व आहे. त्यामुळे मोदी सरकार -2 मध्ये एका महिलेला अर्थमंत्री केल्याचा परिणाम नक्कीच देशात पाहायला मिळणार आहे. 

मोदी सरकार -2 मधील खातेवाटप खालीलप्रमाणे...

मंत्रिमंडळ वाटप (कॅबिनेट )

अमित शहा - गृहमंत्रीनिर्मला सीतारमन - अर्थमंत्रीराजनाथ सिंह - संरक्षण मंत्रीनरेंद्र सिंग तोमर -  कृषीमंत्री, ग्राम विकास आणि पंचायत राजपीयुष गोयल - रेल्वे मंत्री स्मृती इराणी - महिला बालकल्यान मंत्रीनितीन गडकरी - दळणवळणप्रकाश जावडेकर - पर्यावरण आणि माहिती प्रसारण

रवी शंकर प्रसाद- कायदे आणि न्याय, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी

रामविलास पासवान - ग्राहक संरक्षण आणि नागरी वितरण

सदानंद गौडा - रसायन आणि खते

हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया उद्योग

तावरचंद गेहलोत - सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण

डॉ. एस जयशंकर - परराष्ट्र मंत्रीरमेश पोखरियाल - मनुष्यबळ विकासअर्जुन मुंडा - आदिवासी विभागडॉ. हर्ष वर्धन - आरोग्य आणि कुटुंब संवर्धन,  विज्ञान आणि तंत्रज्ञानधर्मेंद्र प्रधान - पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, स्टीलमुख्तार अब्बास नक्वी- अल्पसंख्यांक प्रल्हाद जोशी - लोकसभा, कोळसा आणि खाणडॉ. महेंद्र नाथ पांडे - कौशल्य विकास

गिरीराज सिंह- पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यव्यवसायगजेंद्र शेखावत- जल शक्ती

राज्यमंत्री - स्वतंत्र कार्यभार>> संतोष कुमार गंगवार -कामगार आणि रोजगार>> इंद्रजीत सिंह -सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय>> श्रीपाद नाईक -आयुर्वेद योगा; संरक्षण राज्यमंत्री>> डॉ. जितेंद्र सिंह - इशान्य भारत विकास, पंतप्रधान कार्यालय, अणू उर्जा>> किरण रिजिजू - युवा आणि खेळ>> प्रल्हाद सिंह पटेल - सांस्कृतीक, पर्यटन >> राजकुमार सिंह- उर्जा, नवीन आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा>> हरदीपसिंग पुरी - गृहनिर्माण, नागरी विमानोड्डाण >> मनसुख मांडवीय- जलवाहतूक, रसायन आणि खते राज्यमंत्री

राज्यमंत्री

>> फग्गनसिंह कुलस्ते - स्टील>> अश्विनीकुमार चौबे  आरोग्य आणि कुटुंब कल्यान >> अर्जुन मेघवाल - लोकसभा कामकाज, अवजड उद्योग, समाज कल्यान>> व्ही. के. सिंह - रस्ते वाहतूक>> कृष्णपाल गुज्जर - सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण>> रावसाहेब दानवे - ग्राहक, अन्न व नागरी वितरण>> जी. किशन रेड्डी - गृह मंत्रालय>> पुरुषोत्तम रुपाला -कृषी आणि शेतकरी कल्यान>> रामदास आठवले - सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण>> साध्वी निरंजन ज्योती - ग्रामीण विकास>> बाबुल सुप्रियो - पर्यावरण, वने>> डॉ. संजीवकुमार बालियान - पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यव्यवसाय>> संजय धोत्रे - मनुष्यबळ विकास

>> अनुराग ठाकूर - अर्थ आणि कॉर्पोरेट अफेयर्स>> सुरेश अंगडी - रेल्वे>> नित्यानंद राय -गृह>> रतनलाल कटारिया - जल शक्ती, सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण>> व्ही. मुरलीधरन - परराष्ट्र, लोकसभा कामकाज>> रेणुकासिंह - आदिवासी>> सोमप्रकाश -वाणिज्य आणि उद्योग>> रामेश्वर तेली - अन्न प्रक्रिया उद्योग >> प्रतापचंद्र सरंगी - लघू मध्यम उद्योग, पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यव्यवसाय>> कैलाश चौधरी -कृषी आणि शेतकरी कल्याण>> देवश्री चौधरी -महिला आणि बाल विकास

 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनPM Narendra Modi Cabinetनरेंद्र मोदी मंत्रिमंडळpm modi swearing-in ceremonyनरेंद्र मोदी शपथविधीNarendra Modiनरेंद्र मोदी