Nirbhaya's parents angry over Jaisingh's Statement | खुन्यांना माफ करा, असे सांगण्याची वकिलांना लाज वाटायला हवी! जयसिंग यांच्यावर निर्भयाचे आई-वडील संतप्त

खुन्यांना माफ करा, असे सांगण्याची वकिलांना लाज वाटायला हवी! जयसिंग यांच्यावर निर्भयाचे आई-वडील संतप्त

नवी दिल्ली : ‘निर्भया’च्या खुन्यांना मोठ्या मनाने माफ करावे, या ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांच्या वक्तव्यावर ‘निर्भया’च्या आई-वडिलांनी शनिवारी चीड व्यक्त केली. असे बोलण्याची जयसिंग यांची हिंमतच कशी झाली, असा सवाल ‘निर्भया’च्या आईने केला, तर असे म्हणताना जयसिंग यांना लाज वाटायला हवी, असा संताप तिच्या वडिलांनी व्यक्त केला.

‘निर्भया’च्या खुन्यांना १ फेब्रुवारीस फाशी देण्याचे नवे वॉरन्ट जारी झाल्यानंतर आशा देवी यांनी सरकार व न्यायसंस्थेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यावर अ‍ॅड. इंदिरा जयसिंग यांनी ‘निर्भया’च्या आईने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याप्रमाणे मनाचा मोठेपणा दाखवून मुलीच्या खुन्यांना माफ करावे, असे विधान केले होते.

दरम्यान, हा गुन्हा घडला तेव्हा आपण अल्पवयीन होतो, असे जाहीर करून घेण्यासाठी पवन कुमार गुप्ता या खुन्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्याची यचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळल्याने त्याने अपील केले आहे. त्यावर
२० जानेवारीस सुनावणी होणार आहे.

Web Title: Nirbhaya's parents angry over Jaisingh's Statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.