शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

‘निर्भया’च्या सर्व खुन्यांची आजची फाशी टळली, एका दोषीच्या दया अर्जामुळे शिक्षा तहकूब

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 05:46 IST

डेथ वॉरन्टनुसार या चौघांना शनिवारी सकाळी सात वाजता फासावर लटविले जाणार होते.

नवी दिल्ली : ‘निर्भया’ बलात्कार व खून खटल्यातील मुकेश, पवन गुप्ता, विनय शर्मा व अक्षय कुमार सिंग या चौघांची फाशी तूर्तास टळली आहे. विनय शर्माने राष्ट्रपतींकडे केलेल्या दयेच्या अर्जावर निर्णय व्हायचा असल्याने, डेथ वॉरन्ट काढणाऱ्या सत्र न्यायालयाने फाशीची अंमलबजावणी पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलली. डेथ वॉरन्टनुसार या चौघांना शनिवारी सकाळी सात वाजता फासावर लटविले जाणार होते. जल्लादाने फाशीची रंगीत तालीमही केली होती.

तुरुंग नियमावलीनुसार फाशी झालेल्या गुन्हेगाराचे शिक्षेविरुद्ध दाद मागण्याचे सर्व मार्ग संपल्यानंतर, किमान १४ दिवसांनंतर फाशी देण्याचे बंधन आहे. विनयच्या दयेच्या अर्जावर राष्ट्रपतींनी लगेच निर्णय दिला, तरी डेथ वॉरन्टनुसार ठरलेल्या फाशीच्या तारखेने नियमाची पूर्तता होऊ शकत नाही. त्यामुळे १ फेब्रुवारीची फाशी स्थगित करावी, असा अर्ज चारही खुन्यांनी केला होता. त्यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश धमेंद्र राणा यांनी पुढील आदेशापर्यंत चौघांपैकी कोणालाही फाशी न देण्याचा आदेश दिला.

एकट्या पवनमुळे सर्वांची फाशी थांबविण्याची गरज नाही. त्याला वेगळे ठेवून बाकीच्या तिघांना ठरल्याप्रमाणे फाशी देण्यात काहीच अडचण नाही, अशी भूमिका तिहार कारागृह प्रशासनाने मांडली. निर्भयाच्या पालकांनी व पब्लिक प्रॉसिक्युटरने नवीन कारणे काढून फाशी टाळण्याचे प्रयत्न सहन केले जाऊ नयेत, असा आग्रह धरला.

दिल्ली तुरुंग नियमावलीचा हवाला देत न्यायाधीशांनी नमूद केले की, विनय शर्माच्या दयेच्या अर्जावर निर्णय होईपर्यंत त्याला फाशी देता येणार नाही, हे स्पष्ट आहे. नियमानुसार एखाद्या प्रकरणात एकाहून अनेकांना फाशी झाली असेल व एकाचा जरी अर्ज प्रलंबित असेल, तर त्याचा निर्णय होईपर्यंत इतरांना फाशी देता येत नाही.

निर्भयाच्या पालकांचा मुद्दा होता की, विनयने ७ दिवसांच्या मुदतीनंतर दयेचा अर्ज केला असल्याने, त्या कारणाने डेथ वॉरन्टला स्थगिती देता येत नाही. तो फेटाळताना न्यायाधीश म्हणाले की, फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी डेथ वॉरन्ट काढण्याचा अधिकार या न्यायालयास दंड प्रक्रिया संहितेच्या कलम ४१३ अन्वये आहे व ते स्थगित करण्याचाही अधिकार आहे.प्रत्येकाला कायद्यानुसार दाद मागण्याची प्रत्येक संधी उपलब्ध करून देणे हे सुबुद्ध समाजाचे लक्षण आहे. गुन्हेगारास फाशी झाली आहे. त्याच्या कायदेशीर हक्कांकडे न्यायालये कानाडोळा करू शकत नाहीत.-धर्मेंद्र राणा, अतिरिक्त सत्र न्यायाधीश

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेप