निर्भया बलात्कार प्रकरण : दोषींनी राक्षसी प्रवृत्तीच्या सर्व सीमा ओलांडल्या - सुप्रीम कोर्ट

By Admin | Updated: May 5, 2017 21:10 IST2017-05-05T20:17:39+5:302017-05-05T21:10:57+5:30

निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं सांगितले की, दोषींनी राक्षसी प्रवृत्ती आणि निर्दयीपणाच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत.

Nirbhaya rape case: The guilty crosses all barricades of monstrous tendencies - the Supreme Court | निर्भया बलात्कार प्रकरण : दोषींनी राक्षसी प्रवृत्तीच्या सर्व सीमा ओलांडल्या - सुप्रीम कोर्ट

निर्भया बलात्कार प्रकरण : दोषींनी राक्षसी प्रवृत्तीच्या सर्व सीमा ओलांडल्या - सुप्रीम कोर्ट

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 5 - निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं सांगितले की, दोषींनी राक्षसी प्रवृत्ती आणि निर्दयीपणाच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. दोषींनी केलेले हे कृत्यानं माणुसकीला काळीमा फासणारे आहे. 
 
निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील संपूर्ण घटनाक्रमाचा संदर्भ देत सुप्रीम कोर्टानं निरीक्षण नोंदवले की, "ही घटना कुठल्या तरी दुस-या जगातील आहे जेथे माणसुकीची काही कदरच नाही. दोषींनी एखाद्या जनावराप्रमाणे स्वतःच्या लालसेपोटी एका मुलीला लक्ष्य केलं".
 
सुप्रीम कोर्टानं आपला निर्णय देत या चारही दोषींच्या याचिका फेटाळून लावल्या व फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. 
 
काय आहे निर्भया गँगरेप प्रकरण?
अल्पवयीन दोषीसह सहा जणांनी 16 डिसेंबर 2012 रोजी चालत्या बसमध्ये निर्भयावर बलात्कार केला होता. तसेच निर्भया व तिच्या मित्राला अमानुष मारहाण केली. यानंतर या दोघांना विवस्त्र रस्त्यावर फेकून त्यांच्यावर बस चालवण्याचा प्रयत्न केला. हे दोघं कित्येक तास विवस्त्र कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर पडून होते. या दरम्यान रस्त्यावरुन जाणा-या काहींनी त्यांना काही कपडे दिली व हॉस्पिटलपर्यंत पोहोचवले. 
 
काही दिवसांनंतर निर्भयाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने चार दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. त्यापैकी एक दोषी राम सिंहने जेलमध्येच आत्महत्या केली.निर्भया प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. संसदेतही बलात्कारसंबंधी कायद्यात बदल करण्यात आले आणि कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली. 
 
साकेत येथील फास्ट ट्रॅक कोर्टाने चारही आरोपींना सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोषी ठरवलं होते. चौघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचंही न्यायालयाने विशेष नमूद केलं होतं. कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा नक्की केल्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयाकडे सोपवण्यात आले. चारही आरोपींनीदेखील शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने 13 मार्च 2014 रोजी चारही आरोपी अक्षय ठाकूर, विनय शर्मा, पवन गुप्ता आणि मुकेश यांच्या याचिका फेटाळून लावल्या आणि फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले. 
 
 

Web Title: Nirbhaya rape case: The guilty crosses all barricades of monstrous tendencies - the Supreme Court