शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Nirbhaya Case: केजरीवालांमुळे टळतेय दोषींची फाशी; निर्भयाच्या आई-वडिलांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 20:53 IST

दोषींची फाशीची शिक्षा लांबणावर पडल्यानंतर निर्भयाच्या आई-वडिलांचे केजरीवालांवर आरोप

नवी दिल्ली: निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या चार गुन्हेगारांची फाशी पुन्हा एकदा टळली आहे. पुढील आदेश जारी करेपर्यंत दोषींना फाशी देऊ नका, असे आदेश दिल्लीतल्या एका न्यायालयानं तिहार तुरुंग प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे निर्भया प्रकरणातल्या दोषींची फाशी लांबणीवर पडली आहे. यासाठी निर्भयाच्या आईनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जबाबदार धरलं आहे. तर केजरीवालांनी फाशीच्या शिक्षेला होत असलेल्या विलंबाला कायदे आणि त्यातल्या तरतुदी जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय कायद्यात बदल आवश्यक असल्याचं मतदेखील नोंदवलं आहेन्यायालयानं आज दोषींची फाशी पुढे ढकलली. आणखी किती दिवस अशीच टाळाटाळ सुरू राहणार?, असा सवाल निर्भयाच्या वडिलांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना उपस्थित केला. तुरुंग प्रशासन केजरीवालांच्या अखत्यारित येतं. संपूर्ण व्यवस्था त्यांच्या हातात आहे. त्यांच्यामुळेच सगळं काही थांबलं आहे, असे निर्भयाचे वडील म्हणाले. निर्भयाची आशा देवी यांनीदेखील सरकारच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. 'सरकारं आमचं सांत्वन करतात. कारण त्यांना मतं हवी असतात. सात वर्षांपूर्वी यांनी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. महिला सुरक्षेचं आश्वासन दिलं. तेव्हापासून तिसऱ्यांदा मतदान होत आहे. मात्र आजही गुन्हेगारांचा वकील फाशीविरोधात मला आव्हान देऊन जात आहे,' अशा शब्दांत त्यांनी त्यांची व्यथा मांडली.  मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कायद्यातल्या तरतुदींना जबाबदार धरत यात बदल करण्याची गरज व्यक्त केली आहे. 'निर्भयाचे दोषी कायदेशीर डावपेच वापरुन फाशी टाळत आहेत. त्यांना त्वरित फाशी व्हायला हवी. आपल्याला कायद्यात बदल करायला हवेत. बलात्कार प्रकरणांमध्ये सहा महिन्यांमध्ये फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे,' असं केजरीवालांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपArvind Kejriwalअरविंद केजरीवाल