शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

टेरर फंडिंगप्रकरणी एनआयएच्या चार्जशीटमध्ये 12 जणांसह हाफिज सईद व सय्यद सलाहुद्दीनचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 2:13 PM

काश्मीरमधील दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याप्रकरणी एनआयएनं चार्जशीट दाखल केलं आहे. या चार्जशीटमध्ये 12 जणांची नावं टाकण्यात आली आहे.

नवी दिल्ली- काश्मीरमधील दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याप्रकरणी एनआयएनं चार्जशीट दाखल केलं आहे. या चार्जशीटमध्ये 12 जणांची नावं टाकण्यात आली आहे. त्यात पाकिस्तानमधला जमाद-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद आणि हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन यांचाही समावेश आहे. सहा महिन्यांच्या सखोल चौकशीनंतर एनआयएच्या हाती भक्कम पुरावे सापडले आहेत. त्याआधारेच एनआयएनं या दोन दहशतवाद्यांचं नाव चार्जशीटमध्ये समाविष्ट केलं आहे. दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत एनआयएनंही ही चार्जशीट दाखल केली असून, एनआयएला आरोप सिद्ध करता न आल्यास आरोपी जामीन  मिळवण्यासही पात्र असतील. गेल्या काही दिवसांपूर्वी टेरर फंडिंगप्रकरणी कारवाई करत असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणे (एनआयए)नं हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीनच्या मुलाला अटक केली होती. सय्यद सलाहुद्दीनचा मुलगा शाहिद युसूफ जम्मू-काश्मीरचा सरकारी कर्मचारी आहे. शाहिद युसूफ जम्मू-काश्मीर सरकारच्या कृषी विभागात ज्युनिअर इंजिनीअर आहे. 2011 टेरर फंडिंगप्रकरणी त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. शाहिद युसूफ सौदी-अरेबियामधील हिजबुल मुजाहिद्दीनचा ऑपरेटिव्ह एजाज अहमद भटच्या संपर्कात होता हे तपासात निष्पन्न झालं होतं. एजाज अहमददेखील एनआयएच्या रडारवर आहे. शाहिद युसूफला काश्मीर खो-यात अलगावादी आणि दहशतवादी कारवायांना खतपाणी घालण्यासाठी पैसे पुरवण्यात आले होते. टेरर फंडिंग प्रकरणात गिलानीच्या दुस-या मुलाला NIAनं बजावलं समन्सहुर्रियत कॉन्फरन्सचे फुटीरतावादी नेते गिलानी यांच्या मुलालाही टेरर फंडिंग प्रकरणात एनआयएनं समन्स बजावण्यात आलं होतं. काश्मीरमधील फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्या जवळचे देवेंद्र सिंह बहल यांच्या घर आणि कार्यालयावर एनआयएनं छापेमारी केली होती. टेरर फंडिंगचे धागेदोरे हे पाकिस्तान उच्चायुक्तापर्यंत पसरल्याचंही समोर आलं होतं. फुटीरतावादी नेता गिलानींच्या जावयासहित 7 जण अटकेतकाश्मीर खो-यामध्ये हिंसक कारवाया घडवण्यासाठी तसंच दहशतवाद वाढवण्यासाठी कथित स्वरूपात पाकिस्तानकडून आर्थिक रसद घेतल्याच्या आरोपावरून 24 जुलै रोजी सात काश्मिरी फुटिरतावादी नेत्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) अटक केली होती. जम्मू-काश्मीर पोलिसांतील सूत्र तसेच दिल्लीतील एनआयएमधील एका अधिक-यानं दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्यांमध्ये नईम खान, फारूक अहमद डार ऊर्फ बिट्टा कराटे, अल्ताफ अहमद शाह, शाहिद-उल-इस्लाम, अयाज अकबर, पीर सैफुल्ला व राजा मेहराजुद्दीन कलवल यांचा समावेश होता. 

टॅग्स :hafiz saedहाफीज सईदTerrorismदहशतवादJammu Kashmirजम्मू-काश्मीर