शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

नीरव मोदी लंडनमध्ये करतोय ऐष; हॉटेलच्या खोलीचं एका दिवसाचं भाडं ७५,००० रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2018 3:46 PM

या सूटच्या बाल्कनीतून लंडनच्या सेंट्रल पार्कचा परिसर दिसतो.

मुंबई: पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 11 हजार कोटींचा घोटाळा उघड झाल्यानंतर भारतात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, या घोटाळ्याचा सूत्रधार नीरव मोदी या सगळ्यापासून दूर लंडनमध्ये ऐषोआरामात जगत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नीरव मोदी सध्या न्यूयॉर्कच्या सर्वात महागड्या हॉटेल्सपैकी एक असणाऱ्या जे डब्ल्यू मॅरिएट एसेक्स हाऊस हॉटेलमध्ये वास्तव्याला आहे. नीरवची पत्नी अमी, त्याचा भाऊ निशाल आणि मामा मेहुल चोकसी हे सगळे याठिकाणी एकत्र राहत आहेत. जे डब्ल्यू मॅरिएट एसेक्स हाऊस हॉटेलमधील 36 व्या मजल्यावर त्यांचा लक्झरी सूट आहे. या सूटच्या बाल्कनीतून सेंट्रल पार्कचा परिसर दिसतो. या सूटचे एका दिवसाचे भाडे तब्बल 75 हजार रुपये इतके आहे. नीरव मोदीने 67.50 लाख रुपये मोजून तब्बल तीन महिन्यांसाठी हा सूट बुक केल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नीरव मोदी याला पंजाब नॅशनल बँकेचा घोटाळा उघड होणार याची कुणकुण अगोदरच लागली होती. त्यामुळे नीरव मोदीने अगोदरच या हॉटेलचे बुकिंग केले होते. नीरव मोदी १ जानेवारी रोजी तर बेल्जियमचा नागरिक असलेला त्याचा भाऊ निशाल हाही त्याच दिवशी देशातून पळाला. अमेरिकी नागरिक असलेली नीरवची पत्नी ६ जानेवारी रोजी, तर मेहुल चोकसी ४ जानेवारीला भारतातून पळाले.पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळा उघडकीला आल्यानंतर सीबीआय आणि ईडीने नीरव मोदी याच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकून तब्बल 5 हजार 100 कोटींची मालमत्ता जप्त केली होती. दुसरीकडे  नीरव मोदी व मेहुल चोकसी यांनी भारतात परत यावे आणि तपास यंत्रणांना सामोरे जावे, यासाठी दोघांचे पासपोर्ट शुक्रवारी निलंबित करण्यात आले. मोदी व चोकसीच्या शोधासाठी सीबीआयने इंटरपोलशी संपर्क साधला आहे. त्यांच्याविरोधात ‘डिफ्यूजन नोटीस’ जारी करण्याची विनंती इंटरपोलला केली आहे. 

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीLondonलंडनPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळा