शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

केरळमध्ये निपाह व्हायरसमुळे 10 जणांचा मृत्यू, जाणून घ्या काय आहे निपाह व्हायरस?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2018 2:58 PM

देशात जीवघेणा व अत्यंत दुर्मिळ निपाह विषाणूच्या(Virus) संसर्गामुळे 10 जणांचा मृत्यू झाल्यानं घबराट पसरली आहे.

तिरुवअंनतपुरुम - देशात जीवघेणा व अत्यंत दुर्मिळ निपाह विषाणूच्या(Virus) संसर्गामुळे 10 जणांचा मृत्यू झाल्यानं घबराट पसरली आहे. केरळमधील कोझिकोडमध्ये निपाह विषाणू जलद गतीनं पसरत आहे. या विषाणूमुळे येथील 10 जणांचा मृत्यू झाला आहे. आणखी 25 जणांच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये निपाह विषाणू असल्याचे निष्पन्न झाले आहे. निपाह विषाणूचा धोका लक्षात घेता केरळ सरकारनं केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. केरळ सरकारच्या मागणीची गांभीर्यानं दखल घेत केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डानं नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (एनसीडीसी)चं पथक केरळमध्ये पाठवण्याचे आदेश दिलेत.  

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, निपाह विषाणू हा वटवाघुळामुळे फळ-फुलांच्या माध्यमातून मनुष्य आणि जनावरांमध्ये पसरत आहे. 1998 साली मलेशियातील कांपुंग सुंगई निपाह परिसरातून या विषाणूबाबतची प्रकरणं समोर आली होती. यामुळे या विषाणूला 'निपाह' असे नाव देण्यात आले. सर्वात आधी डुकरांमध्ये याचा परिणाम पाहायला मिळाला होता. 2004मध्ये बांगलादेशात हा विषाणू मोठ्या प्रमाणात पसरला होता. केरळमध्ये प्रथमच निपाह विषाणू पसरल्याची माहिती समोर आली आहे.  

(सावधान... निपाह विषाणू ठरतोय जीवघेणा; ही लक्षणं दिसताच त्वरित उपचार घ्या!)

- निपाह विषाणूबाबतची माहिती मनुष्य आणि जनावरांमध्ये पसरणारा निपाह हा गंभीर संसर्गजन्य विषाणू आहे. यास NiPah Virus Encephalitis (Encephalitis म्हणजे मेंदूला आलेली सूज) असंही म्हटलं जातं. या संसर्ग फळ-फुलांद्वारे होतो. खजुराचे उत्पन्न घेणाऱ्या लोकांमध्ये या विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती समोर आली आहे. 2004 साली या विषाणूमुळे बांगलादेशातील नागरिक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले होते.  

- निपाह विषाणू संसर्गाची लक्षणंरुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो.मेंदूमध्ये जळजळ होते.  मेंदूला सूजदेखील येण्याची शक्यता असते. ताप, डोकेदुखी, चक्कर येणे.डॉक्टरांनुसार काही प्रकरणांमध्ये योग्य वेळेत निदान किंवा उपचार न झाल्यास रुग्ण कोमामध्ये जाण्याचीही शक्यता असते. 

- कशी घ्याल स्वतःची काळजी?निपाह विषाणूवर अद्यापपर्यंत प्रभावी लस उपलब्ध झालेली नाही. या विषाणूची लागण होऊ नये यासाठी फळं विशेषतः खजूर खाणं टाळले पाहिजे. जमिनीवर पडलेली फळं खाणं शक्यतो टाळलं पाहिजे. आजारी डुक्कर तसंच अन्य प्राण्यांपासून दूर राहिले पाहिजे. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीलाही याचा संसर्ग होतो. त्यामुळे विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. 

टॅग्स :Nipah Virusनिपाह विषाणूKeralaकेरळDeathमृत्यू