शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

Nipah virus: निपाह विषाणूचा धोका वाढला, अशी आहेत लक्षणे आणि त्यापासून बचावाचे उपाय 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2021 4:53 PM

Nipah virus update: केरळमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढला आहे. त्यातच राज्यात निपाह विषाणूचेही रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे.

नवी दिल्ली -केरळमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढला आहे. त्यातच राज्यात निपाह विषाणूचेही रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. केरळमधील कोझिकोडे जिल्ह्यात निपाहचा पहिला रुग्ण सापडला आहे. (Nipah virus) त्यामुळे येथे एका १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे निपाह विषाणूबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज आपण निपाह विषाणूची लक्षणे आणि त्यापासून बचावासाठीच्या उपाययोजना जाणून घेऊयात. (Increased risk of Nipah virus, symptoms and measures to prevent it)

निपाह विषाणू एक जुनोटिक आजार आहे. तो प्राण्यांमधून माणसांमध्ये पसरतो. हा विषाणू केवळ ज्यांच्या पाठीला कणा आहे अशाच प्राण्यांच्या माध्यमातून माणसांमध्ये येतो. तसेच माणसांमधून माणसांमध्येही या विषाणूचा फैलाव झाल्याच्या काही घटना घडल्या आहेत. सर्वप्रथण मलेशियामध्ये डुक्कर पाळणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये याची लक्षणे दिसून आली होती. बंगालमधील सिलीगुडीमध्ये २००१ आणि २००७ मध्ये हा आजार दिसून आला होता. हा विषाणू बहुतांशी एका विशिष्ट्य भागातच राहतो. तसेच रोगी संपर्कात आल्यास पसरतो.

निपाह विषाणूच्या संसर्गाची लक्षणे - जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार निपाह विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तींमध्ये सुरुवातीला ताप, डोकेदुखी, स्नायूंचे दुखणे, उलटी आणि घशामध्ये खवखव अशी लक्षणे दिसून येतात. - त्यानंतर चक्कर येणे आणि एन्सेफललायटीससुद्धा होऊ शकतो. काही रुग्णांना असामान्य निमोनिया आणि श्वसनासंबंधीच्या गंभीर समस्या दिसून येतात. - गंभीर अवस्थेत पोहोचलेल्या रुग्णाला एन्सेफलायटीस आणि झटके येऊ शकतात. त्यानंतर रुग्ण २४ ते ४८ तासांमध्ये कोमात जाऊ शकतो. हा विषाणू ४ ते १४ दिवसांपर्यंत अॅक्टिव्ह राहतो. निपाह विषाणू हा बाधित डुक्कर किंवा फळ खाणाऱ्या वटवाघळांच्या माध्यमातून फैलावतो. बांगलादेश आणि भारतामध्ये हा विषाणू सर्वसामान्यपणे फळे किंवा फलांपासून घेण्यात येणाऱ्या उत्पादनांपासून पसरतो. त्याच्या संसर्गाचे सर्वात मोठे कारण हेच आहे.  

बचावासाठीचे उपाय - जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार जर निपाह विषाणूच्या संसर्गाचा संशय असल्यास त्या जनावरांचा परिसर त्वरित सोडला पाहिजे. तसेच ही जागा क्वारेंटाईन केली पाहिजे.- लोकांमध्ये संसर्ग होण्याची शक्यता कमी करण्यासाठी बाधित जनावरांना नष्ट करावे, तसेच या जनावरांचे मृतदेह तज्ज्ञांच्या देखरेखीखाली दफन करा- बाधित शेतांमधून प्राण्यांची ये जा आणि अन्य भागात प्रतिबंधात्मक उपाय केल्यामुळे आजाराचा प्रसार कमी करता येऊ शकतो. कच्च्या खजुराचा रस किंवा ताडीचे सेवक करता कामा नये. केवळ धुतलेल्या फळांचे सेवक करावे. जमिनीवर पडलेली अर्धवट फळे खाणे टाळा  

टॅग्स :Nipah Virusनिपाह विषाणूIndiaभारतHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स