(निनाद) सिंहगड एक्स्प्रेस, बारामती पॅसेंजरला संलग्न करण्याचा निर्णय

By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:43+5:302015-03-14T23:45:43+5:30

दौंड : मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस (गाडी क्र. ११00९) व कर्जत-बारामती पॅसेंजरला (गाडी क्र. ५२३४७) संलग्न करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असल्याची माहिती दौंड-पुणे प्रवासी संघाचे मानद अध्यक्ष प्रेमसुख कटारिया, तसेच पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य विकास देशपांडे यांनी सांगितले. हा बदल दि. २० मार्च २०१५ पासून प्रायोगिक तत्त्वावर अमलात येणार आहे. तसेच, दोन्हीही गाड्या रेल्वेस्थानकात समोरासमोरील प्लॅटफॉर्मवर उभ्या करण्यात येणार आहेत. जेणेकरून सिंहगड एक्स्पे्रेसमधून येणार्‍या प्रवाशांची धावपळ होणार नाही. शुक्रवार (दि. २०) पासून पुणे स्टेशनमधून कर्जत-बारामती पॅसेंजर सायंकाळी ६.३५ ऐवजी ६.४५ वाजता सुटेल. याकामी रेल्वे प्रशासनाच्या वतीने सिनीअर डिव्हिजनला ऑपरेटिंग मॅनेजर अशोक तिवारी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. दौंड ते पुणेदरम्यान विवि

(Ninead) Sinhagad Express, Baramati Passenger | (निनाद) सिंहगड एक्स्प्रेस, बारामती पॅसेंजरला संलग्न करण्याचा निर्णय

(निनाद) सिंहगड एक्स्प्रेस, बारामती पॅसेंजरला संलग्न करण्याचा निर्णय

ंड : मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस (गाडी क्र. ११00९) व कर्जत-बारामती पॅसेंजरला (गाडी क्र. ५२३४७) संलग्न करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असल्याची माहिती दौंड-पुणे प्रवासी संघाचे मानद अध्यक्ष प्रेमसुख कटारिया, तसेच पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य विकास देशपांडे यांनी सांगितले. हा बदल दि. २० मार्च २०१५ पासून प्रायोगिक तत्त्वावर अमलात येणार आहे. तसेच, दोन्हीही गाड्या रेल्वेस्थानकात समोरासमोरील प्लॅटफॉर्मवर उभ्या करण्यात येणार आहेत. जेणेकरून सिंहगड एक्स्पे्रेसमधून येणार्‍या प्रवाशांची धावपळ होणार नाही. शुक्रवार (दि. २०) पासून पुणे स्टेशनमधून कर्जत-बारामती पॅसेंजर सायंकाळी ६.३५ ऐवजी ६.४५ वाजता सुटेल. याकामी रेल्वे प्रशासनाच्या वतीने सिनीअर डिव्हिजनला ऑपरेटिंग मॅनेजर अशोक तिवारी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. दौंड ते पुणेदरम्यान विविध रेल्वे स्थानकांतून दैनंदिन प्रवास करणार्‍यांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे. तसेच, पिंपरी-चिंचवड येथील औद्योगिक क्षेत्रात कामासाठी जाणारेदेखील असंख्य दैनंदिन प्रवासी आहेत.
सायंकाळी सदर दैनंदिन प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. सायंकाळी ६.३५ वाजता कर्जत-बारामती पॅसेंजर गाडीनंतर थेट रात्री ८.५ वाजता पुणे-दौंड पॅसेंजर गाडी उपलब्ध आहे. त्यामुळे पुणे ते दौंडदरम्यान रेल्वे स्थानकात या दोन गाड्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही गाडी थांबत नाही म्हणून हडपसर, मांजरी, लोणी, उरुळी, यवत, खुटबाव, केडगाव, कडेठाण, पाटस येथील प्रवाशांची अत्यंत गैरसोय होत होती; पण दौंड-पुणे दौंड प्रवासी संघाच्या सततच्या पाठपुराव्याने सदर गैरसोय दूर करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

Web Title: (Ninead) Sinhagad Express, Baramati Passenger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.