शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

नऊ वर्षांनंतर गुरुवारी कंकणाकृती सूर्यग्रहण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 06:03 IST

महाराष्ट्रात खंडग्रास स्थिती : सकाळी ८ वाजता दोन ते तीन मिनिटे दिसणार

मुंबई : यंदाच्या वर्षातील अखेरचे सूर्यग्रहण गुरुवारी होणार आहे. या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांतील काही भागांतून दिसणार असून, महाराष्ट्रासह उर्वरित भारतातून हे सूर्यग्रहण खंडग्रास स्थितीत दिसणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली आहे.

सोमण यांनी सांगितले की, नऊ वर्षांपूर्वी १५ जानेवारी २०१० रोजी झालेल्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती भारतातून दिसली होती. खग्रास सूर्यग्रहणावेळी जर चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर चंद्रबिंब संपूर्ण सूर्यबिंबाला झाकून टाकू शकत नाही. त्यामुळे जरी चंद्र्रबिंब सूर्यबिंबाच्या आड आले तरी सूर्यबिंबाची गोलाकार कडा दिसतच राहते. याला ‘फायर रिंग’ असेही म्हणतात. अशा वेळी कंकणाकृती सूर्यग्रहण दिसते. २६ डिसेंबर रोजी अशी कंकणाकृती अवस्था दक्षिण भारतातील कोइम्बतूर, धरपूरम, दिंडीगुल, एरोडे, कान्हनगड , कन्नूर, करूर, कोझीकोडे, मदेकेरी, मंगळूरु, मंजेरी, उटीसह देशातली इतर भागात दिसणार आहे. राज्यातून ‘ग्रहणदर्शन’राज्यात सुमारे ८० ते ८४ टक्के सूर्यबिंब चंद्रबिंबामुळे झाकले गेलेले दिसणार आहे. मुंबईतून सकाळी ८ वाजून ४ मिनिटांनी सूर्यग्रहणास प्रारंभ झालेला दिसेल. ग्रहणमध्य सकाळी ९ वाजून २२ मिनिटांनी होईल. त्यावेळी जास्तीत जास्त सूर्यबिंब चंद्रबिंबामुळे झाकलेले दिसेल. सकाळी १० वाजून ५५ मिनिटांनी सूर्यग्रहण पूर्णपणे सुटेल. या वेळांमध्ये स्थानपरत्वे काही प्रमाणात बदल होवू शकतो.ही घ्या काळजी : सूर्यग्रहण साध्या डोळ्यांनी पाहू नये. पाहिल्यास दृष्टीस इजा होते. ग्रहणचष्म्यातूनच ते पाहावे वा थेट सूर्याकडे न पाहता छिद्र असलेल्या चाळणीतून पांढऱ्या कागदावर सूर्याची प्रतिमा घेऊन त्यात निरीक्षण करावे. दुर्बिण वा द्विनेत्रीतून पाहताना योग्य फिल्टरचा वापर करावा.गैरसमज टाळा : ग्रहण पाहू नये, या वेळेत जेवू नये, झोपू नये, असे समजले जाते. त्यात काहीही तथ्य नसल्याचे दा. कृ. सोमण यांनी सांगितले. हा नैसर्गिक आविष्कार आहे. सावल्यांचा खेळ आहे.

टॅग्स :Sun strokeउष्माघातdelhiदिल्लीcoimbatore-pcकोयंबटूर