शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

शिवराज सिंह चौहान यांच्यावर दगडफेक केल्याप्रकरणी काँग्रेसच्या नऊ पदाधिकाऱ्यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2018 5:47 PM

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर झालेल्या दगडफेकीप्रकरणी काँग्रेसच्या नऊ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. 

भोपाळ -  विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर आल्याने मध्य प्रदेशमधील राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान,  मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या ताफ्यावर चुरहट मतदार संघात दगडफेक झाली होती. या प्रकरणी काँग्रेसच्या नऊ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची जन आशीर्वाद यात्रा सध्या सुरू आहे. दरम्यान, शिवराज सिंह चौहान यांची यात्रा चुरहट विधानसभा मतदारसंघातील परपरा गावात आली असताना चौहान यांच्या यात्रेवर अज्ञातांनी हल्ला केला होता. या प्रकरणी चौकशी केल्यानंतर 9 जणांना अटक करण्यात आली.  याबाबत मध्य प्रदेशचे गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनी सांगितले की, "या प्रकरणी आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले सर्वजण काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याचे निष्पन्न झाले आहे. मुख्यमंत्र्यांवर झालेल्या हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे." 

 दरम्यान, सीधी जिल्ह्यातील मायापूर येथे शिवराज सिंह चौहान यांना विरोध दर्शवत काळे झेंडे दाखवण्यात आले होते. पण काळे झेंडे दाखवणाऱ्यांबाबतची माहिती अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकलेले नाही.

टॅग्स :shivraj singh chauhanशिवराजसिंह चौहानvidhan sabhaविधानसभाBJPभाजपा