(निनाद) अधिकार नसतानाही दिले जन्म-मृत्यूचे दाखले
By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:01+5:302015-03-20T22:40:01+5:30
वाकी बुद्रुक सरपंचाचा प्रकार : पंचायत समिती, जिल्हा परिषदेकडे तक्रार

(निनाद) अधिकार नसतानाही दिले जन्म-मृत्यूचे दाखले
व की बुद्रुक सरपंचाचा प्रकार : पंचायत समिती, जिल्हा परिषदेकडे तक्रारआसखेड : वाकी बुद्रुक (ता. खेड) येथील सरपंच सुरेखा टोपे यांनी अधिकाराचा गैरवापर करून जन्म-मृत्यूच्या नोंदीचे दाखले नागरिकांना अधिकार नसताना दिले. याबाबत पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती अंकुश गारगोटे यांनी दिली. गावातील वामन टोपे यांचा ६/२/८१ रोजी के.ई.एम. हॉस्पिटल पुणे येथे मृत्यू झाला होता. परंतु वाकीच्या सरपंच सुरेखा टोपे यांनी अधिकार नसताना ११/३/१४ रोजी स्वत:च्या सहीने संबंधित अर्जदारास मृत्यूचा दाखला दिला. खरंतर दाखल्यावर सही ग्रामसेवकाची असते. गावाच्या परिसराशिवाय मृत झालेल्या व्यक्तीची मृत्यूची नोंद नगरपालिका, हॉस्पिटलमध्ये झाल्यास दाखला त्या-त्या ठिकाणाहून आणणे आवश्यक आहे. परंतु सरपंच टोपे यांनी स्वत:च्या स्वाक्षरीने दाखले दिले. त्यामुळे पुणे महानगरपालिकेत मृत्यू झालेल्या वामन टोपे यांचा मृत्यू वाकी येथे झाल्याचे चुकीचे दाखवून दाखला देण्यात आला आहे. त्यांनी दिलेल्या बनावट दाखल्यामुळे जन्ममृत्यू अधिनियम १९६९ च्या नियमानुसार त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमप यांच्याकडे गारगोटे यांनी केली आहे.