(निनाद) ज्ञानराज पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दिलीप वाव्हळ
By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:23+5:302015-09-01T21:38:23+5:30
आळेफाटा : आळे येथील ज्ञानराज सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दिलीप वाव्हळ व उपाध्यक्षपदी प्रीतम काळे यांची बिनविरोध निवडी झाली.

(निनाद) ज्ञानराज पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दिलीप वाव्हळ
आ ेफाटा : आळे येथील ज्ञानराज सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दिलीप वाव्हळ व उपाध्यक्षपदी प्रीतम काळे यांची बिनविरोध निवडी झाली.आळे येथील या सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. यामध्ये दिलीप वाव्हळ, सुधीर वाव्हळ, ॲड. दत्तात्रय भागवत, प्रीतम काळे, रामदास शिंदे, डॉ. विठ्ठल लांडे, जावेद मोमीन, समीर आतार, विठ्ठल जाधव, समीर टकले, संतोष लासुर्वे, मंगला तितर, सुप्रिया शिरतर यांची निवड झाली.दरम्यान, नवनिर्वाचित संचालक मंडळाची अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीकरिता निवडणूक निर्णय अधिकारी जे. बी. मुलाणी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. तीमध्ये दिलीप वाव्हळ याची अध्यक्ष व प्रीतम काळे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.फोटो ओळी. ज्ञानराज सहकारी पतसंस्था अध्यक्ष व उपाध्यक्ष फोटो. ०००