शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
2
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
3
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
4
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
5
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
6
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
7
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
8
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
9
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
10
Wipro च्या नव्या सीईओंना किती वेतन मिळणार माहितीये? त्यात येतील दोन प्रायव्हेट जेट!
11
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
12
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
13
बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या होत्या ३०८ गर्लफ्रेंड्स, त्यांना घेऊन जायचा कब्रस्तानात, कारण वाचून व्हाल हैराण
14
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
15
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
16
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
17
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
18
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
19
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
20
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात

कोरोनामुळे पुन्हा बिघडली परिस्थिती, 'या' दोन राज्यांतील 8 शहरांमध्ये उद्यापासून नाईट कर्फ्यू!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2020 11:29 PM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील वेगवेगळ्या राज्यांना आता पुन्हा एकदा खबरदारीच्या दृष्टीने पावले उचलणे भाग पडत आहे.

नवी दिल्ली - कोरोनापुढे जगातील बड्या-बड्या देशांनी गुडघे टेकेले आहेत. याला भारतही अपवाद नाही. कोरोनामुळे देशातील वेगवेगळ्या राज्यांना आता पुन्हा एकदा खबरदारीच्या दृष्टीने पावले उचलणे भाग पडत आहे. याच पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश आणि गुजरातमधील काही शहरांत उद्या रात्रीपासून नाईट कर्फ्यू लावला जाणार आहे.

एएनआय या वृत्त संस्थेने उपमुख्यमंत्री नितिन पटेल यांचा हवाला देत म्हटले आहे, की गुजरातच्या राजकोट, सूरत आणि वडोदरामध्ये, उद्यापासून आवश्यक आणि आपत्कालीन सेवा पुरवणाऱ्या लोकांशिवाय कुणालाही रात्री 9 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत बाहेर येण्याची परवानगी नसेल.

मध्यप्रदेशातील इंदूर, भोपाळ, ग्वाल्हेर, विदिशा आणि रतलाममध्येही उद्यापासून रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कर्फ्यू असेल. मात्र, या काळात आवश्यक सेवा पुरविणाऱ्या तसेच फॅक्ट्री वर्कर्सना सूट दिली जाईल, असे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे.

राजस्थानात कलम 144 -  राजस्थान सरकारने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना 21 नोव्हेंबरपासून कलम 144 लगू करण्याचा सल्ला दिला आहे. राजस्थानात आता कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. येथे थंडीबरोबरच आता कोरोना रुग्ण संख्येतही वाढ होऊ लागली आहे. राज्यात 19 नोव्हेंबरला पहिल्यांदाच एका दिवसात अडीच हजारहून अधिक कोरोना रुग्ण आढळले. यामुळे आता राजस्थान सरकारनेही कोरोना संक्रमणाचा सामना करण्याच्या दृष्टीने कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेशGujaratगुजरात